Wednesday, May 11, 2022

समाजाच्या अभिवृद्धीत शिवाचार्यांचा मोलाचा वाटा : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी


समाजाच्या अभिवृद्धीत शिवाचार्यांचा मोलाचा वाटा : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी
काशी येथे अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचा महामेळावा
सोलापूर  दि 11 : प्रतिनिधी राजशेखर बुरुकुले 
अध्यात्माच्या पायावरच भारतीय संस्कृतीचा डोलारा उभा आहे. धर्मकारणातून संस्कृतीचे धडे देण्यात येत असल्याने माणुसकी टिकून राहिली आहे. धर्मकार्य करण्याबरोबर शिक्षण, अर्थकारण, प्रबोधन करण्याबरोबर भरकटलेल्या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचे काम शिवाचार्यांनी केले आहे. यामुळे समाज घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
             अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचा महामेळावा जंगमवाडी मठ वाराणसी (काशी) येथे झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्नाटक राज्याचे कार्यवाह बी. एल. शंकर, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, मंद्रूप मठाचे रेणूक शिवाचार्य महास्वामी, गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थानचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी, होटगी मठाचे सचिव शांतय्या स्वामी, यांच्यासह देशभरातील शिवाचार्य, होटगी आणि काशी पीठाचे भक्त उपस्थित होते.
         काशीपीठाचे ८५ वे जगद्गुरू लिंगैक्य विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांची जयंती काशी पीठात साजरी करण्यात आली. यावेळी लिंगैक्य विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
           काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा गुरुवारी १२ मे रोजी ७५ वा वाढदिवस तर शुक्रवारी १३ मे रोजी होटगी मठाचे मठाधीश आणि काशी पीठाचे उत्तराधिकारी डॉ. धर्मरत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचा पट्टाभिषेकाचा महासोहळा होणार आहे.

            गत ४२ दिवसापासून सुरू असलेल्या या भक्ती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथील भक्तांबरोबर गोवा, रशिया, अमेरिका येथील मूळ भारतीय आणि काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी दीक्षा दिलेले हजारो भक्तगण सहभागी झाले आहेत. यामुळे केवळ काशी पिठाचा हा सोहळा नसून विश्वाचा परिवर्तनाचा सोहळा ठरला आहे, अशा भावना जमलेल्या भक्तांमधून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...