वडूज येथे म.बसवेश्वर जयंती विविध कार्यक्रमांनी अतिशय उत्साहात संपन्न
सातारा, दि.4 - प्रा.अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी वडूज सातारा
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे मंगळवार दि.3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म.बसवेश्वर जयंती अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
सकाळी बरोबर 9.30 वा. म.बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष सचिन महादेव शेटे यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिर येथे करण्यात आले.पूजा पाठ विधी व आरती श्री बालाजी स्वामी यांनी पार पाडली.या वेळी अनेक स्त्री पुरुष भक्त हजर होते.नंतर सर्वांनी अतिशय आनंदाने म.बसवेश्वर प्रतिमे बरोबर आपले वैयक्तिक व सामूहिक फोटो काढून सोशल मीडिया वर प्रसारीत केले.
त्यानंतर श्री बसव मूर्तीचे उप नगराध्यक्ष मनोज कुंभार,नगरसेविका रेश्मा बनसोडे,काका बनसोडे,अविनाश माळी,राकेश सोनटक्के यांनी दर्शन घेतले.
त्यानंतर वडूज तहसील कार्यालय येथे शासकीय कार्यक्रम पार पडला.तेथे नायब तहसीलदार रवींद्र जाधव, विजय काळे,मदने मॅडम यांचे हस्ते म.बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी सर्व पदाधिकारी हजर होते. नायब तहसीलदार यांना प्रशासनातील उत्कृष्ट सेवेचे प्रशस्ती पत्र मिळाल्याबद्दल त्यांचे समाज संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या नंतर वडूज नगरपंचायत येथे म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा मनिषा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सुनील काळे, मा.नगराध्यक्ष सुनील गोडसे,काका बनसोडे, ओंकार चव्हाण, नगरसेविका शोभा वायदंडे , रेश्मा बनसोडे , राधिका गोडसे हजर होत्या.श्री. तानाजी वायदंडे साहेब व नगरसेवक अभय देशमुख , नगराध्यक्षा सौ.मनिषा काळे यांनी म.बसवेश्वर यांच्या विषयी माहिती सांगितली.या वेळी प्रसाद जगदाळे,सागर लंगडे ,किशोर शिवलिंग तोडकर व समाज प्रतिनिधी हजर होते.
यानंतर पंचायत समिती ,खटाव. वडूज येथे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.श्री.नानासाहेब खाडे साहेब ,श्री.चव्हाण साहेब यांनी म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचे महत्व विषद केले.तीनही कार्यालयांना समाज संघटनेच्या वतीने नवीन श्री बसव प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या
दु.3 वा.श्री हनुमान मंदिर येथे श्री बसव प्रतीमेसमोर श्री शिव योगिनी महिला भजनी मंडळ यांचा श्री भगवान शंकर यांची गाणी,लघुरुद्र व काल भैरव अष्टक स्तोत्र यांचे पठण कार्यक्रम झाला.या मध्ये शिव योगिनी स्मिता येवले,स्वाती तोडकर,अर्चना येवले,सोनाली येवले,वंदना येवले,शुभांगी गाड वे, उज्वला येवले,रेणुका महाजन, मालन शेटे,उज्वला ताई झाडे,ताई येवले यांनी सहभाग घेतला.हे लघुरुद्र मंडळ काशी जगद्गुरु पंचाचार्य महाराज यांचे कडून सन्मानित आहे.
त्यानंतर संध्याकाळी ठीक 6 वा. म.बसवेश्वर प्रतिमेची मिरवणूक सुरू झाली धनाजी ब्यांड यांनी वाद्य व स्पीकर वर श्री शंकराची सुंदर भजने म्हटली श्री साईराम रथ,बन पुरी यांच्या सुशोभित अश्वारूढ वरात गाडीत म.बसवेश्वर यांची प्रतिमा स्थानापन्न करण्यात आली होती.प्रतिमा काळजी श्री. बसवेश्र्वर येवले व जगदीश शेटे यांनी घेतली. मिरवणुकी पुढे म.बसवेश्वर यांचे होर्डिंग् व धर्म ध्वज जीपवर व मारुती गाडीवर लावण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी सर्व एक हजार भक्त मुले,मुली ,तरुण तरुणी,महिला पुरुष यांच्या हातात धर्म ध्वज फडकत होते.तसेच सर्वांना म.बसवेश्वर यांच्या चित्राचे भगवे बिल्ले लावण्यात आले होते. जागोजागी स्त्री पुरुष भक्त रथ प्रतिमेचे पूजन करत होते. ' वीरशैव लिंगायत धर्माचा विजय असो, म.बसवेश्वर महाराज की जय,हर हर महादेव ' अशा घोषणा जोरात देण्यात आल्या.चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. व डू ज पोलीस स्टेशन ने अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता.गुप्त वार्ता विभागाचे कॉन्स्टेबल श्री.प्रकाश इंगळे साहेब सर्व कार्यक्रमावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून होते.
रात्री ठीक 8 वा.श्री हनुमान मंदिर येथे समाज सभा घेण्यात येवून समाजातील जेष्ठ नागरिक स्त्रीपुरुष यांचा सन्मान करण्यात आला.शालेय जीवनात विशेष प्राविण्य व स्कॉलरशिप मिळविलेल्या कु.हर्षदा शेटे,चिन्मय महाजन,अखिलेश गाड वे,अमेय मि ठारे सिध्दी गाडवे, अनन्या गाडवे , समृद्धी म्हामणे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मा. ना.तहसीलदार कमलाकर भादुले, मा.गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते, मा.मुख्याध्यापिका ललिता स्वामी,नोटरी अँड. प्रिया म्हामणे, शैक्षणिक नोकरदार महिला सौ.मनिषा शेटे, ज्योती घेवारे नूतन गाडवे , राजमाने सर्,राजमाने मॅडम , वीरशैव व्हिजन प्रश्न मंजुषा अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या व घरात श्री बसव प्रतिमा पूजन करणाऱ्या सौ.अर्चना येवले,स्वाती तोडकर, म.बसवेश्वर स्मारक समिती सदस्य श्री.प्रदिप शेटे,सौ.अर्चना येवले , अँड.सोमनाथ भरमगुंडे,दिलीप ढोले,सुहास ढोले, पत्रकार धनंजय क्षीरसागर .चेअरमन शरद कदम, सौ.मनाली व अमोल म्हामणे यांचा नामोल्लेख करून स्वागत व सत्कार करण्यात आले.
म.बसवेश्वर यांचे जीवन कार्य व समाज संघटना यांच्यावर मा. प्रा.नागनाथ स्वामी,प्रा.अजय शेटे, गुरुवर्य सचिन गाडवे,सौ.उज्वलाताई झाडे यांनी आपले मौलिक विचार मांडले .
चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस व होमगार्ड कर्मचारी, अंतर्गत महिरप व सजावट करणारे ओंकार डेकोरेटर्स चे आदित्य शेटे,स्पीकर व लाईट व्यवस्था करणारे लल्लू आतार, वाजंत्री मालक धनाजी दुबळे,साईराम रथ चे मालक श्री.नवनाथ देवकर यांचा नामोल्लेख करून ऋण निर्देश व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पूजा व महाआरती अध्यक्ष रोहित म्हामणे यांच्या हस्ते करण्यात आली. व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संध्याकाळी पासून ओंकार गाडवे यांनी एक हजार भाविक भक्तांसाठी अन्न महाप्रसाद तयार करून ,रात्री ठिक नऊ वाजता अन्नदान महाप्रसाद वाटप कार्यकारिणी सदस्य ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.हा अन्नदान महाप्रसाद दानशूर अन्नदाते ओम साई बिल्डर ग्रूप,श्री. सुनिल उर्फ नामदेव शेटे , श्री. शंकर एकांडे मिस्त्री, मिथील उर्फ मुन्ना शेटे,सचिन शेटे यांचे तर्फे देण्यात आला. समाजातील सर्व स्त्री पुरुष भाविक भक्तांनी ' अन्नदाता सुखी भव !' म्हणत त्यांच्या प्रती ऋण निर्देश व्यक्त केला.अन्नदान महाप्रसाद घेण्यासाठी नगरसेवक अनिल माळी हे विजय शेटे व केदार तोडकर यांचेसह हजर राहिले होते.समाज कार्यक्रमांना मदत करणाऱ्या इतर धर्म व जाती मधील काही निवडक व्यक्तींना अन्न महाप्रसाद घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवीन कार्यकारिणी अध्यक्ष रोहित म्हांमणे, उपाध्यक्ष सचिन शेटे,सचिव मिथिल शेटे,खजिनदार अमित गाडवे ,सदस्य आलोक महाजन, ओंकार शेटे,सागर म्हामणे,महेश गाडवे ,अमर शेटे,चैतन्य म्हामणे,श्रीनाथ स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा भव्य दिव्य व जंगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुरुवातीपासून श्री.सतीश शेटे,श्री.विजय बापू शेटे ,
शेखर भाऊ म्हामणे, सुभाष काका येवले ,कुमार काका शेटे, अरविंद भू शेटे गुरुजी, गजानन शेटे,प्रशांत शेटे,श्रीकांत म्हामणे.अविनाश तोडकर, अशोक गाडवे,सागर येवले,हरिभाऊ देशमाने, सोमनाथ येवले,राहुल म्हामणे सूरज ठिगळे ,राजेंद्र शेटे यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.
No comments:
Post a Comment