प्रेम आणि विश्वास असेल तरच जगणं सुंदर : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमाला
सोलापूर दि 4 : राजशेखर बुरकुले ,सोलापूर
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या तिन्ही गरजा कितीही उच्च प्रतीच्या दिल्या तर जगणं सुंदर होईलच असं नाही. मात्र आपल्यामध्ये प्रेम आणि विश्वास असेल तरच जगणं सुंदर होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांनी केले.
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प 'सुंदर गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, वीरशैव युवक महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की सध्याच्या काळात माणसाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. कोरोना काळात आपण बाहेर पडत नव्हतो. अशा काळात वीरशैव व्हिजन एक व्हिजन ठेवून कार्य करीत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रारंभी चिदानंद मुस्तारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलकप्पा बणजगोळे यांनी तर आभार अमोल कोटगोंडे यांनी मानले.
यावेळी आज या उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल भीमाशंकर करजगीकर यांचा व मुक्या जनावरांवर उपचार करणाऱ्या राहत ॲनिमल केअर या संस्थेचे डॉ. अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांपैकी लकी ड्रॉ मधील पाच भाग्यवान विजेत्यास वीरशैव व्हिजनचे सचिव नागेश बडदाळ यांच्यावतीने पाच भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमेश्वर याबाजी, संजय साखरे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, संगमेश कंठी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, गणेश घाळे, शिव कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर हत्तरकी, अमित कलशेट्टी, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment