Thursday, May 5, 2022

मनमाड शहर वीरशैव लिंगायत समाजाची ऑनलाईन बैठक उत्साहात संपन्न


 मनमाड शहर वीरशैव लिंगायत समाजाची  ऑनलाईन बैठक उत्साहात संपन्न
सातारा, दि.5 -  प्रा अजय शेटे 
मनमाड शहर वीरशैव लिंगायत समाजाची बैठक नुकतीच दि.4.5.2022 रोजी जेष्ठ व प्रमुख कार्यकर्त्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन स्वरूपात पार पडली.यावेळी मनमाड शहर अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .
     अध्यक्ष पदी श्री.गणेश आप्पा शांतीलाल आप्पा देशमुख तर उपाध्यक्ष श्री. किरण स्वामी शिवाप्पा जंगम ,सचिव श्री.राहुल दत्तात्रय क्षीरसागर,खजिनदार श्री.शुभम शिवनाथ आप्पा चिनुके,कार्यकारी अध्यक्ष श्री.हेमंत स्वामी जंगम अशा प्रकारे नवीन समाज कार्यकारीणी स्थापन करण्यात आली.
हि कार्यकारिणी जेष्ठ समाज मार्गदर्शक श्री.बाळासाहेब गोंधळे ,गोविंद काका लिंगायत शशिकांत हिंगमिरे,शंकर आप्पा चिनुके ,संतोष आप्पा हुकीरे,मनोज स्वामी जंगम,शशिकांत काखंडकी ,कृष्णा आप्पा सुराडे,रमेशआप्पा गोंधळे,विजय आप्पा गोंधळे, विलास आप्पा हुकीरे यांच्या संमतीने निवडण्यात आली. 
यामध्ये लिंगायत संघर्ष समितीचे धडाडीचे नेते मा.गणेशआप्पा शांतीलाल देशमुख यांची मनमाड शहर व पंचक्रोशीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .त्या बद्दल लिंगायत संघर्ष समितीच्या सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...