Friday, May 6, 2022

लिंगायत आरक्षणासाठी मंत्रालयात ना.वडेट्टीवार व मागासवर्ग आयोग सदस्याबरोबर बैठक संपन्न


लिंगायत आरक्षणासाठी मंत्रालयात ना.वडेट्टीवार व मागासवर्ग आयोग सदस्याबरोबर बैठक संपन्न
मुंबई दि 5 :- प्रसाद वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV live
 सरसकट लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी दि.4 मे 2022 रोजी मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार व मागासवर्ग आयोगाचे सदस्य व अधिकारी यांच्या बरोबर बैठक झाली.
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांनी लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी मांडतांना मंत्री महोदयांना सांगितले की, महाराष्ट्रात लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदु लिंगायत, वाणी व वीरशैव नावाने ओळखले जाते. 2014 साली तत्कालीन सरकारने वाणी व लिंगायत वाणी या नावाला ओबीसीचे आरक्षण लागु केले. मात्र लाखोंच्या संख्येने लिंगायत समाज बांधवाच्या कागदपत्रांवर हिंदु लिंगायत किंवा धर्म हिंदु, जात लिंगायत अशी नोंद लावण्यात आली असल्याने त्या लिंगायत आरक्षणाचा फायदा सरसकट लिंगायतांना होत नाही. म्हणून वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लिंगायत नावाला लागु करण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे कारण वाणी व लिंगायत या दोन वेगळ्या जाती नसून त्या एकाच जातीची दोन नावे आहेत. आणि अशा पध्दतीचे शुध्दीपत्रक काढून सरसकट लिंगायत समाजाला आरक्षण लागु करून त्याचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती केली. ते पुढे मंत्री महोदयांना म्हणाले, लिंगायत समाजातील तरूणांना विविध व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध होण्यासाठी महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. यावर वडेट्टिवार साहेबांनी लिंगायत समाजाला आरक्षण लागु होण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन प्रविणकुमार बिरादार यांना दिले. व तशा सुचनाही अधिकार्‍यांना दिल्या. तसेच यावेळी प्रविणकुमार बिरादार यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य व अधिकार्‍यांशीही सविस्तरपणे चर्चा केली. यानंतर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याशी मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्‍वर स्मारकाबाबतही प्रविणकुमार बिरादार यांनी चर्चा केली असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
यावेळी सांगलीचे प्रदिपबापू वाले व उस्मानाबादचे शिवानंद कथले हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...