खानापूर देगलूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे आयोजन..!
खानापूर देगलूर दि 2 :-
शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासुन देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लावले होते. यावर्षी कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला आहे. शासनाने सर्व निर्बंध उठवले असल्याने यावर्षी महात्मा बसवेश्वर यांची जयंती धुमधडाक्या साजरी होणार आहे.त्या अनुषंगाने खानापूर येथेही बस्वजयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खानापूर (ता.देगलूर) येथे बस्वजयंती आयोजन समितीच्या वतिने दि. मे महिन्याच्या पंधरवाड्यात क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांची भव्यदिव्य जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहीती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती आयोजन समितीच्या माध्यमातून दिनांक दि. ३ मे अक्षय तृतीया रोजी महात्मा बसवेश्वर मंदिर येथे सकाळी ८:३० वाजता बसव ध्वजाजारोहन माजी उपसरपंच श्री अनंत पाटील खानापूरकर व समितीच्या वतीने करण्यात येईल त्यानंतर सामूहिक राष्ट्रगान होईल व येथुन महादेव मंदिर ते खानापूर फाटा येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या नियोजित जागेपर्यंत भव्य अशी मोटारसायकल रॅली निघणार असुन या ठिकाणी महात्मा बसवन्ना पुतळ्याचे फलक पुजन होईल व त्यानंतर यांचे समारोप खानापूर ग्रामपंचायतच्या सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पुजनाने केला जाणार आहे. तरी
सर्व समाज बांधवांनी व बहुजनांनी, समता नायक महात्मा बसवेश्वरांच्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे नम्र आवाहन महात्मा बसवेश्वर उत्सव समिती खानापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment