Sunday, May 1, 2022

उंब्रज चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.अजय गोरड साहेब यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान.

 उंब्रज चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.अजय गोरड साहेब यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान.  
उंब्रज, दि.1 - प्रतिनिधी प्रसाद वाकडे
 उंब्रज पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक मा.अजय गोरड साहेब हे गेल्या तीन वर्षापूर्वी उंब्रज पोलीस स्टेशन ला अधिकारी म्हणून आल्यापासून त्यांनी आपल्या दैदिप्यमान कामगिरी ने उंब्रज गाव आणि पंचक्रोशीत आपल्या धडाकेबाज कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे .
त्यांनी कोरो ना महामारी काळात लोकांच्या आरोग्याची काळजी करत ' लॉक डाऊन ' चे कार्य अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले.या काळात अवैध व्यवसायावर जरब बसविली.तसेच गावगुंड,चोर अशा उपद्रवी इसमांचा बंदोबस्त केला. व सामान्य माणसांचे जीवन सुखी व सुरक्षित बनविले.ते आल्या पासून महिला वर्गाला मोठी सामाजिक सुरक्षितता वाटू लागली आहे. लॉक डाऊन काळात गैरप्रकार करणाऱ्या लोकांकडून त्यांनी आर्थिक दंड वसूल करून देवून आपली प्रशासनावर ची मजबूत पकड दाखवून दिली.उंब्रज ग्राम पंचायतीला त्यांनी दंड रक्कम वसूल करून देवून ,सामाजिक सुधारणा व विकास करून देण्यासाठी हातभार लावला.त्यामुळे उंब्रज ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती सुधारली जाऊन अनेक विकास कामे करता आली.
आपल्या धाडसी कामगिरी मुळे संघटित गुन्हेगारी विरोधात त्यांनी दोन मोक्काचे प्रस्ताव तसेच इतर अशा एकूण 60 गुंडांना हद्दपार करून आपली वेगळी सामाजिक सुरक्षिततेची कामगिरी दाखवून दिली.
त्यांच्या या कार्यात जिल्हा पोलिस अधीक्षक मा.अजयकुमार बन्सल साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक मा.अजित बोराडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ रणजित पाटील साहेब, सहा.पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे,पोलीस अंमल दार या सर्वांचे मोठे सहकार्य.लाभले आहे.
त्यांच्या या महान कामगिरी साठी त्यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक  जाहीर होऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्याबद्दल उंब्रज कर नागरिक तसेच पंचक्रोशी यांचे तर्फे मा अजय गोरड साहेब यांचे आपला सातारा न्युज ,आणि लिंगायत TV live च्या वतीने हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.हार्दिक शुभेच्छा .

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...