वीरशैव महिला मंडळातर्फे आरोग्य जागृती शिबिर संपन्न
संभाजीनगर,दि.17- प्रणाली वाकडे. प्रतिनिधी लिंगायत TV live
वीरशैव लिंगायत महिला मंडळ,संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे क्रांती चौक वॉर्ड मधील मीनाताई ठाकरे सभागृहात ' 'आपला आहार - आपले आरोग्य या ' अभियानांतर्गत ऐन उन्हाळ्यात कोणते शीतपेय घेवून आपले वजन कमी करून आरोग्य नियंत्रित करता येते.या विषयी विमल हब्बू मॅडम यांनी उपस्थित महिलांना शीतपेय बनवण्याच्या प्रात्यक्षिकासह मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा राणी वाडकर,स्मिता कोठुळे व स्मिता ममदापूरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment