Tuesday, April 19, 2022

वडूज येथे महात्मा बसवेश्वर जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न



वडूज येथे महात्मा बसवेश्वर जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न 
वडूज, दि.19 -प्रा.अजय शेटे प्रतिनिधी
 म.बसवेश्वर जयंती मंगळवार दि.3 मे रोजी साजरी होणार आहे.त्याबाबत योग्य नियोजन होणेसाठी वडूज , ता.खटाव, जि.सातारा.येथील समाज कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दि.18 रोजी रात्री 8.30 ते 10.30 या वेळेत ओंकार मंगल कार्यालयात , वडूज येथे घेण्यात आली.
या मध्ये गत वर्षीचा हिशोब लेखा जोखा,समाजाची प्रलंबित कामे पूर्तता व आर्थिक नियोजन यांचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर नवीन समाज समिती निवड,वर्गणी,म.बसवेश्वर प्रतिमा प्रतिष्ठापना,प्रसाद,स्त्री - पुरुष भजन कार्यक्रम आयोजन,मिरवणूक या विषयी चर्चा होऊन कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली.
जुनी समाज कार्यकारिणी बदलून त्या जागी नवीन तरुण तडफदार कार्यकर्त्यांची कार्यकारिणी तयार करण्यासाठी इच्छुक तरुणांच्या नावांच्या  चिठ्ठ्या मध्यभागी  टाकून त्यातून जेष्ठ मार्गदर्शक कार्यकर्त्यांच्या हातून चिठ्ठी उचलून पदे जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये सन 19 एप्रिल 2022 पासून रोहित म्हांमणे ( अध्यक्ष ) ,सचिन शेटे ( उपाध्यक्ष ) मिथिल शेटे ( सचिव ) आलोक महाजन ( खजिनदार ) व  ओंकार शेटे , राहूल म्हामणे , महेश गाडवे,चैतन्य म्हामणे ,अमित गाडवे,श्रीनाथ स्वामी ,अमर शेटे ( सर्व सदस्य) 
अशा प्रकारे नवीन कार्यकारी समिती तयार करण्यात आली. 
  मार्गदर्शक समिती पदी  माजी अध्यक्ष प्रा.अजय शेटे, प्रशांत शेटे,श्रीकांत म्हामणे,शेखर म्हामणे,अविनाश तोडकर,अशोक गाडवे,प्रमोद महाजन, राहूल शेटे, कमलाकर भादुले, सागर म्हाम णे बंडा स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली.
म.बसवेश्वर जयंती कार्यक्रम यशस्वी पणे साजरा होणे साठी सर्व समाज कार्यकर्त्यांनी तन - मन - धन पूर्वक सहकार्य करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला.
बैठकीला सर्व समाज कार्यकर्ते हजर होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...