Wednesday, April 13, 2022

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा सत्कार


 महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा सत्कार 
सातारा, दि.12 -प्रा.अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
 पंचायत समिती,खटाव, व डू ज मध्ये आज मगळवार, दु.1 ते 3 या वेळेत सातारा येथे पार पडलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व मदत करणाऱ्या खटाव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
माजी सभापती व जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष संदिप मांड वे , मा.सभापती जयश्री कदम मॅडम,यांच्या हस्ते व डू ज येथील हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज मधील क्रीडा शिक्षक राजेंद्र जगदाळे यांचा उत्कृष्ट कुस्ती निवेदन केल्याबद्दल तसेच मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे क्रीडा शिक्षक प्रा.श्रीमंत कोकरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला म्हणून तसेच श्री. फिरोझ मुलाणी सर् यांचा उत्कृष्ठ कुस्ती वार्तांकन केल्याबद्दल  व आदर्श ड्रायव्हर व ग्रा. प.सदस्य श्री.शिंगाडे यांचा खास सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला एस एस कन्स्ट्रक्शन ,निमसोड चे श्री.मोरे ,प्रा. एन.आर.स्वामी, विजय शिंदे,श्री.कदम सर् पत्रकार नितीन राऊत, मुन्ना मुल्ला,प्रा.अजय शेटे,यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व सत्कार मूर्ती व मा. सभापती मॅडम,माजी सभापती यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.घार्गे सर्, ज. स्वां.वडगाव यांनी केले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...