करवीर संस्थान संस्थापिका - महाराणी ताराराणी साहेब
विशेष लेख - प्रा.अजय शेटे,
सातारा, दि.14 - तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराऊ म्हणजेच छ.राजाराम महाराज यांच्या सुविद्य पत्नी, कोल्हापूर संस्थान संस्थापिका महाराणी ताराबाई होत.
मराठ्यांचा इतिहासातील एक कर्तबगार राजस्त्री. छ.शिवराय आणि छ.संभाजीराजे यांच्या पाठी मागे स्वराज्याची धुरा ज्यांनी कणखर पणे सांभाळली.संताजी व धनाजी सारख्या कर्तबगार सरदारांना बरोबर घेवून तत्कालीन मोगलांना ' सळो की पळो ' करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांमधील एक मानाचे पान होय.
छ.राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगानी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी छ.महाराणी ताराबाईंनी आक्रमक भूमिका घेतली.मराठे शाही तील मुत्सद्द्याना काळाचे गांभीर्य समजावून देवून शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून त्यांनी शत्रूला थोपवून धरले.लष्कराचा आत्मविश्वास वाढवला.मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे एका चढीत एक कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले.
दिल्ली च्या राज सत्तेवर स्वतःचा असा एक वेगळा धाक निर्माण केला.मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथा ई व सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ निर्माण केले. छ.महाराणी ताराबाई यांच्या रूपाने त्याकाळी महाराष्ट्राला एक करारी नेतृत्व मिळाले .
आपल्या धाडसी पराक्रमाच्या जोरावर मुघल बादशाह औंरंगजेबास स्वराज्या पुढे गुढगे टेक वायला लावून इथेच मातीत घालणाऱ्या त्या राम राणी ठरल्या.
" दिल्ली झाली दि न वाणी , दिल्लीशाचे गेले पाणी,
ताराबाई राम राणी ,
भद्रकाली कोपली ,
तारा बाईच्या बखते,
दिल्लीपती ची तखते ,
ख चो लागली ते वी मते ,
कुराणेही खंडली,
राम राणी भद्र काली ,
रण रंगी कृद्ध झाली,
प्रलयाची वेळ आली ,
मुघल हो - सांभाळी,
मुघल हो -सांभाळी "
छ.महाराणी ताराबाई यांच्या रूपाने त्याकाळी महाराष्ट्राला असे एक करारी नेतृत्व मिळाले.याचा इतिहासाला ही व मराठाशा ही लाही नक्कीच अभिमान आहे.
अशा या महाराणी तारा बाई यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती.त्यासाठी त्यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन
No comments:
Post a Comment