Wednesday, April 13, 2022

शिवाचार्य गुरुजींच्या पुण्यस्मरणा निमित्य गणित स्पर्धा परीक्षेचे आयोजन.




शिवाचार्य गुरुजींच्या पुण्यस्मरणा निमित्य गणित स्पर्धा परीक्षेचे आयोजन..
 खानापूर दि 13 : शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live प्रतिनिधी
खानापुर येथील एक आदर्श शिक्षक कै.नागभुषन शिवाचार्य गुरुजी यांचे दि १४ एप्रिल रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त किर्तनाचे व विद्यार्थ्यासाठी गणिताच्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन खानापूर येथे करण्यात आले असुन या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले  आहे,
कै.नागभुषन शिवाचार्य गुरुजींचा जन्म  दि.३० डिसेंबर १९३७ मध्ये एका जंगम कुटुंबात झाला,अवघे दिड वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यांनंतर त्यांचे वडील रामलिंग गुरुजी यांनीच त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांचे १० वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले, त्यावेळी दहावीचे परिक्षा केंद्र हैदराबाद येथे होते,ती परिक्षा दिल्यानंतर शिक्षक म्हणून त्यांची प्रथम नेमणूक सन १९५८ साली प्राथमिक शाळा किनी ता.देगलूर येथे झाली, प्राथमिक शिक्षक म्हणून नौकरी करतच त्यांनी १९६८ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले व नंतर बीए बी एड ही पुर्ण करुन माध्यमिक शिक्षक म्हणून रूजू झाले,ते गणिताचार्य होते,सोप्या पद्धतीने हसत खेळत गणित शिकवण्याच्या त्यांच्या अंगभूत कलेमुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते, त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्यामध्ये त्यावेळी त्यांचे विद्यार्थी राहीलेले, आमदार कै.रावसाहेब अंतापुरकर, चंद्रप्रकाश देगलूरकर,रामलू शहापूरकर, यासारखे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज विद्यार्थी त्यांनी घडवले, कै.नागभुषन गुरुजींनी त्यांच्या  ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा काळात एकही स्वेच्छा रजा घेतली नव्हती हे विशेष आहे, सेवा मुक्त झाल्यानंतर त्यांना अर्धांग वायूने ग्रासले यातंच दि १४ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाच्या लाटेत त्यांना कोरोनाची लागन झाली व गुरुजी अनंतात विलीन झाले,
कोरोना च्या निर्बंधांमुळे अनेकांना इच्छा असून देखील नागभुषन गुरुजींच्या  अंत्यदर्शनासाठी जाता आले नाही.त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रथम स्मृतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम स्मृतिदिनाचा कार्यक्रम १४ रोजी सकाळी  होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन त्यांचे पुत्र शिवानंद शिवाचार्य गुरुजी (मु.अ.जि.प.हनेगांव)यांनी केले आहे..

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...