Sunday, April 17, 2022

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने सांगली येथे शिवबसव मंडळाची बैठक संपन्न


महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने सांगली येथे शिवबसव मंडळाची बैठक संपन्न 
.
सातारा, दि.16 -प्रा.अजय शेटे 
 सांगली येथील शिवबसव सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ ची मंगळवार दि.3 में रोजी असणाऱ्या म.बसवेश्वर जयंती कार्यक्रमाची नियोजन बैठक पार पडली.
यावेळी अध्यक्ष रवींद्र बुक टे यांचे उपस्थितीत बरेच निर्णय घेण्यात आले.
लिंगायत समाज सर्व पोट जातीतील सुशिक्षित बे रों ज गा र नोकरी मेळावा घेणे,वधुवर मोफत मेळावा घेणे.त्याचे पुस्तक काढणे.पुस्तक ज्यांना पाहिजे असेल त्यांनी रू.300 /- भरून नोंद करणे.गुणवंत विद्यार्थी व पदाधिकारी समाज बांधव यांचा सत्कार करणे. म.बसवेश्वर जयंती दिवशी सकाळी 7 वा. शहरातून मोटारसायकल रॅली काढणे.शहरात 20x30 ची मोठी 25 व लहान 100 होर्डिंग्ज लावणे. दि.3 मे रोजी दु.12 वा.वीरभद्र मंदिर,गावभाग येथे श्री बसवं  जन्मोत्सव व

 महाप्रसादाचे आयोजन करणे. दासो ह करणे करिता गावभाग येथील म.बसवेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.कोरे साहेब यांचेशी संपर्क करणे.
अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित होऊन सर्व समाज बांधवांनी तन मन धन पूर्वक कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...