Monday, April 18, 2022

सातारा येथील लिंगायत शरणी युवा उद्योजीका कु. स्वप्नजा भांदुर्गे 'युवा उद्योजिका ' पुरस्काराने सन्मानित



सातारा येथील लिंगायत शरणी युवा उद्योजीका 
कु. स्वप्नजा भांदुर्गे 'युवा उद्योजिका ' पुरस्काराने सन्मानित 
सातारा  दि 18 :- प्रणाली वाकडे प्रतिनिधी
येथील लिंगायत समाजातील लिंगायत शरणी कु. स्वप्नजा रमेशचंद्र भांदुर्गे हिस 'रिसिल डॉट इन 'व 'महाराष्ट्र राज्य जिल्हा उद्योग केंद्र 'यांचे संयुक्त विद्यमाने पहिला युवा महिला उद्योजिक ता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
   महाराष्ट्र उद्योजिकता विकास कार्यक्रमांतर्गत नाशिक येथील आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विश्व तेज सोलर एनर्जी प्रा.लि. च्या माध्यमातून अपारंपारिक उर्जे बाबत जनजागृती करून पर्यावरण रक्षण करण्याच्या कामामध्ये व ऊर्जा व्यवसायामध्ये अतिशय कमी वयात  यशस्वी उद्योजिका म्हणून तिने मिळवलेले हे यश निश्चित च उल्लेखनीय आहे.
त्यांच्या या व्यावसायिक यशाबद्दल त्यांचे प्रसिद्ध साहित्यीक प्रतापराव गंगावणे, म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा ,लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
लिंगायत टिव्ही च्या वतीने पण तिचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...