Sunday, April 17, 2022

लिंगायत अल्पसंख्य दर्जासाठी पाठपुरावा करणार - खा.धैर्यशील माने


 लिंगायत अल्पसंख्य दर्जासाठी पाठपुरावा करणार - खा.धैर्यशील माने .
कोल्हापूर, दि.16 - 
लिंगायत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्य दर्जा मिळावा यासाठी आपण स्वतः जातीने प्रयत्न करणार आहे.असे प्रतिपादन खा.धैर्यशील माने यांनी केले.' आंदोलनाची यशदायी वाटचाल ' या पुस्तकाच्या कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवनात झालेल्या द्वितीय आवृत्ती प्रकाशना वेळी ते बोलत होते.
अध्यक्ष स्थानी लिंगायत धर्म महासभेचे अध्यक्ष आर.एस.देशिंगे,पुणे हे होते.
लिंगायत समाजाची अल्पसंख्यांक मागणी रास्त व हक्काची आहे. म.बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात समतेवर आधारित ' अनुभव मंडप ' ही संस्था स्थापन केली.गाव पातळीवर लिंगायत समाजाचे स्वतंत्र अस्थित्व व ओळख आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी लिंगायत बोर्डिंग ला जागा दिली. जैन,मुस्लिम अल्पसंख्य आहेत तर मग लिंगा य त समाजाला पण ते मिळाले पाहिजे.यासाठी आपण संसदेत आवाज उठवला.
   राज्य अध्यक्ष आर.एस.देशिंगे म्हणाले की ,अल्पसंख्य व संविधनिक दर्जा मिळावा.यासाठी ' आंदोलनाची यशदायी वाटचाल ' हे पुस्तक प्रा.संजय पाटील यांनी संपादित केले असून पहिली आवृत्ती मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व द्वितीय आवृत्ती मा.खा.धैर्यशील माने यांचे हस्ते प्रकाशित झाली.या मागणीला केंद्र शासनाकडून यश मिळणे साठी ' लिंगायत धर्म महासभा' हि संघटना कटिबद्ध आहे.
  राज्य सरचिटणीस बी .एस.पाटील  यांनी मा.खा.माने यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली.आजपर्यंत 300 खासदारांना प्रस्तावाची फाईल सुपूर्द केल्याचे सांगितले.या कार्यात बेंगलोर पासून दिल्ली पर्यंत अनेक प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी, मठा धिश यांचेशी चर्चा करून दिल्ली दरबारी सकारात्मक प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.
प्रा.बी.एस.पाटील,
प्रा.संजय पाटील,श्रीमती जयश्री खिलारे यांनी पण आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष राहूल कोठावळे,महिला जिल्हाध्यक्षा सौ.रश्मी अशोक चौगुले ,सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर विभुते,महिला जिल्हाध्यक्ष चेतना भांदुर्गे,सचिव संजय पाण दारे,महिला सचिव सौ.वैशाली माळी,शहराध्यक्ष सौ.गीता वड गुळे ,कार्यकारिणी सदस्य,महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
कार्यक्रमात  स्वागत राजेंद्र पिंपळे,आभार कोल्हापूर शहराध्यक्ष संतोष तोडकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...