गावची कन्या या संकल्पनेतुन प्रत्येक मुलीच्या लग्नाला लागणार हातभार .. खानापूरातील युवकांचा स्तुत्य उपक्रम....
खानापूर दि 16 :-
शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live प्रतिनिधी
- हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून खानापूर (ता. देगलूर) येथील काही युवकांनी एकत्रित येत गावची कन्या विवाह सहयोग योजना राबविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. खानापूर येथील अभियंता असलेले दत्तात्रय ताडकोले,सत्वराज विभुते व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घेत गावची कन्या विवाह सहयोगी
योजनेची संकल्पना मांडली व या माध्यमातून गावांतील लोकसहभागातून प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी भेटरूपी मदत करणार आहेत. या गावची कन्या विवाह सहयोग योजनेचा प्रारंभ केला असुन या त्यांच्या समाजपयोगी संकल्पनेस शोषल मिडीयाद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आहे, गावातील अनेक दानशूर पुढे येत असुन सढळ हस्ते निधी देत असुन आता गावातिल वरपित्याचे काही प्रमाणात का होईना पण या योजनेच्या मदतीतून मुलीच्या लग्नातील खांद्यावर असणारे ओझं काही अंशी का होईना पण कमी होणार असल्याने सर्वच स्तरातून या लोकाभिमुख योजनेची व, या योजनेची संकल्पना मांडणाऱ्या युवकांची स्तुती होताना दिसत आहे
या उपक्रमात गावातील सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होत आहेत व सढळ मदत ही करीत असल्याने सामाजिक एकोप्याचे अनोखे चित्र खानापूर मध्ये पाहावयास मिळते आहे,
No comments:
Post a Comment