परिवर्तन काळाची गरज-----
गाढे परिवाराचा देहदान करण्याचा निर्णय क्रांतिकारक व आदर्श
सिन्नर दि 17 :-
डॉ.श्यामसुंदर झळके, लिंगायत TV live प्रतिनिधी
परिवर्तन काळाची गरज-----
गाढे परिवाराचा देहदान करण्याचा निर्णय क्रांतिकारक व आदर्श
समाजात अजूनही कालबाह्य रूढी परंपरा आहेत.आपला वीरशैव लिंगायत समाजही त्यास अपवाद नाही.कालसुसंगत परिवर्तन समाजाची गरज आहे.स्मशानभूमीची सगळीकडे च वानवा आहे.त्यात वाढती लोकसंख्या,बेकायदेशीर होणारी अतिक्रमणे चिंतनीय आहेत.लिंगायत समाजासाठी तात्काळ स्मशानभूमी साठी मागणी झाल्यास त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी असे जिल्हाधिकारी यांचे आदेश, शासनाचे परिपत्रक दहा बारा वर्षांपासून आपण पाहतो.प्रत्यक्षात कोणत्या संघटनेने मागणी करून,त्याचा पाठपुरावा करून स्मशानभूमी साठी जागा मिळविली हा संशोधनाचा भाग आहे.अपवादात्मक काही उदाहरणे असतीलही पण ती बोटावर मोजण्याइतकी.अन्यथा दोन चार किलोमीटरवर असलेली स्मशानभूमी,त्यावर काही अतिक्रमित घरे.एकाच जागेवर दोन तीन वेळा खड्डे करून पार्थिव पुरलेले,कालांतराने त्या मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वर्षभर पुन्हा समाधीकडे ( आता समाधी बांधत नाही) फिरकणे होत नाही. अंत्यविधी साठी लागणारा वेळ,पूजाविधी,वेळेचा अपव्यय, खड्डा खोदण्यासाठी जेसीबी शिवाय पर्याय नाही,माणसे मिळालीतर दोनतीन हजार खर्च आदि अनेक समस्यांना तोंड देताना नाकीनव येते.केवळ धर्माच्या नावाखाली प्रथा,परंपरा सुरू ठेवण्यासाठी अट्टाहास करणे, त्या बदलात समांतर समाजव्यवस्था जागेची उपलब्धता आहे का? होईल का? कोणी प्रयत्न करते का? अशी अनेक प्रश्नांची मालिका तयार होईल.मी धर्माच्या,परंपरेच्या अजिबात विरोधात नाही पण त्यासाठी पर्यायी व्यवस्था आहे का याचे भान राखणे गरजेचे आहे.जागा भरपूर उपलब्ध करून घ्या,कितीही समाध्या बांधा, परंतु वेळेवरच अंत्यविधीच्या ठिकाणी चर्चा झडतात,त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यासाठी अग्निसंस्कार,देहदान तसेच अवयवदान असे सक्षम पर्याय आहेत.आपल्या समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत.तशी मानसिकता तयार होत आहे ही अभिनंदनीय बाब आहे. या गोष्टी केलेतर धर्म बुडेल अशी वाटणारी भीती व त्याविरोधात टीका टिप्पणी निरर्थक बाब आहे असे माझे वयक्तिक मत आहे.त्याचा विपर्यास होऊ नये.प्रत्येकाला घटनेने व्यक्ती स्वातंत्र्य,मत स्वातंत्र्य दिले आहे.वाद करण्यासाठी नाही,एखाद्याला टार्गेट करण्यासाठी नाही.प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे, त्यावर विचारमंथन झाले पाहिजे.त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही,वाईटपणा येईल या भीतीने गप्प बसणे सोयीचे मानतात.मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल? मागे माझ्याविरोधात गैरसमज,अपप्रचार झाला.परंतु मी माझ्या मतावर ठाम होतो,आजही आहे,प्रबोधन करत राहणार,समुपदेशन करून जनजागृती करणार,कोणावर सक्ती करणार नाही.मी कोणाच्या दबावाखाली येत नाही.कोणी पाठिंबा दिला,साथ दिली,सोबत आलेतर स्वागतच आहे,नाही आले तरी अकेला चलो ची भूमिका करीत राहणार.ज्याच्या घरी प्रसंग घडतो त्याची अवस्था काय असते,हे त्यालाच कळते." कळतं पण वळत नाही "- अशी त्याची अवस्था होते.असो श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक गिरीषआप्पा गाढे यांचे काल (ता.१६) नगरच्या खासगी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी गाढे यांची देहदान करण्याची इच्छा होती.अनेकदा त्यांनी तसे माझ्याशी बोलताना सांगितले होते.त्यांच्या मुलांना व पत्नीला हे माहीत होते.त्यामुळे पुढची कार्यवाही करण्यासाठी मी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजशी संपर्क साधून रात्री उशिरा रात्री साडेआठला मृतदेह त्यांच्याकडे सर्व आवश्यक पूर्तता करून सुपूर्द केला.दरम्यान जंगमच्या हातून सर्व पूजाविधी,श्रद्धांजली आदि सोपस्कार पार पाडले. विशेष म्हणजे एकच वर्षापूर्वी गिरीष गाढे यांच्या मातोश्री चे निधन ७५ व्या वर्षी झाले.तत्पूर्वी आठ दहा वर्षांपूर्वी च त्यांनी ( सुमनताई) देहदनाचा फॉम भरला होता.अवघे सहावी सातवी झालेल्या महिलेने किती पुरोगामी विचार स्वीकारला याची कल्पना येईल,नंतर तशी कल्पना दिली होती.त्याचे समर्थन करताना त्या माउलीने आपला देह मातीत जाण्यापेक्षा किंवाअग्नीत जाळण्यापेक्षा दुसऱ्याच्या कामी येईल यासारखे पुण्य नाही असा उदात्त विचार या माऊलीचा होता.आपण केवळ स्वतः ला सुशिक्षित म्हणवतो परंतु वेळ आल्यावर काही थातुरमातुर कारण सांगून टाळतो.आईचेच अनुकरण करून त्यांच्या मुलाने तोच कित्ता गिरवून देहदान केले.खरोखर गाढे कुटुंबाचा क्रांतिकारक निर्णयास मनापासून सलाम
No comments:
Post a Comment