बंडखोर दिगंबर शरणी - अक्कमहादेवी यांची आज जयंती ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
बंडखोर दिगंबर शरणी - अक्कमहादेवी यांची आज जयंती ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.16 - आज चैत्र पौर्णिमा लिंगायत शरणी अक्कमहादेवी यांची जयंती.वीरशैव लिंगायत धर्मियांच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
म. बसवेश्र्वर यांना सर्व जन बसवण्णा असे म्हणतात. ' आण्णा ' या शब्दाचा अर्थ आहे सर्वात मोठा भाऊ.ज्याचा आदर्श घ्यावा.ज्याचे अनुकरण करावे.ज्याचा सल्ला मानावा असा केवळ नात्यानेच नव्हे तर मनाने विश्वास असणारा आदर्श थोरला भाऊ.
तसेच अक्कमहादेवी ही महान अशी थोरली बहीण आहे.म्हणून तिला 'आक्का ' असे म्हटले जाते.म्हणून तिचा महादेवी ते अक्कमहादेवी होण्याचा जीवन प्रवास अभ्यासण्या सारखा आहे.
या अक्कमहादेवी ला कल्याण पर्वातील महा नायिका मानले जाते. व त्यामुळे तिला महत्वाचे स्थान आहे.तिचा जन्म आजच्या शिमोगा जिल्ह्यातील विथणी/उड जारी येथे झाला.तिचे वडील निर्मल शेट्टी हे रत्नपारखी सराफ होते.अनेक रत्ने व मोती यांचा व्यापार ते करत असत.आईं सुमती ही गृहपत्नी होती.महादेवी लहानपणापासून अतिशय सुंदर,बुद्धिमान,हुशार व चुनचूनित व चन्नमल्लिकार्जुन श्री शंकराची निस्सीम भक्ती करणारीहोती.ती जशी तरुण होत चालली.तसे तिचे मानसिक व शारीरिक साैंदर्य आणखीनच खुलत गेले.
तिच्या या रूप सौंदर्याची व भक्तीची महती कौशिक राजाला समजली.त्याने तिला पाहिल्यावर तो तिच्यावर लुब्ध झाला. व त्याने तिच्यावर चे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिच्या आईवडिलांकडे लग्नाची मागणी घातली.राजाच्या या मागणीला तिच्या आईवडिलांनी नकार दिला.त्यावेळी राजाने मोठा दबाव आणून लग्नास परवानगी मिळवली. त्यावेळी राज हट्टा समोर हतबल होऊन त्यांनी होकार दिला.त्यावेळी महादेवी ने लग्न करण्यासाठी राजासमोर दोन अटी ठेवल्या.राजाने प्रेमाच्या भरात अविचाराने त्या मान्य केल्या.
त्यातील पहिली अट होती की, राजा महादेवीच्या देव कार्य उपासनेत कोणताही अडथळा निर्माण करून विरोध करणार नाही.आणि दुसरी म्हणजे राजा कधीही तिच्या मना विरोधात तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवणार नाही.राजाने या दोन्हीही अटी मान्य केल्यावर लग्न झाले.
बरेच दिवस राजा आणि ती फक्त गप्पा गोष्टीचं करत राहिले.या कालखंडात महादेवी ची देव भक्ती अजिबात कमी न होता वाढीस च लागली.राजाने बरेच दिवस संयम ठेवला.परंतु नंतर त्याला मोह अनावर होऊ लागला तसा तो महादेवी ला त्रास देवू लागला.महादेवी मात्र प्रत्येक वेळी त्याच्या वचनांची आठवण त्याला करून देवू लागली.
एकदा राजाचा राग अनावर झाला तेव्हा त्याने तिला राजसभेत पाचारण केले व याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. व जबरदस्तीने सर्वांसमोर तिच्याशी वाईट वर्तन सुरू केले.
तेव्हा ती राजाला म्हणाली तू जबरदस्ती करून माझे शरीर घेवू शकतोस पण मला मनाने जिंकू शकत नाहीस.असे म्हणून बंडखोर वृत्तीने तिने आपली सर्व वस्त्रे राजदरबारात सर्वा समक्ष उतरविली व ती दिगंबर झाली. व हात जोडून, डोळे मिटून चन्न मल्लिकार्जुन देवाचे नामस्मरण करू लागली.तिच्या या भर सभेतील वर्तनाला राजा व राजसभा काहीच करू शकली नाही.सर्वजण रागाने लज्जित होऊन तिथून निघून गेले.तशी ती तशीच पूर्ण नग्नावस्थेत राजदरबार सोडून बाहेर नगरातून चालू लागली.सर्व नगर प्रजाजन हे दृश्य पहात होते नगर सोडून ती जंगलात गेली व तिथे एका गुहेत तिने आश्रय घेतला.तिथून पुढे रोज दिवसभर ती गुहेत वास्तव्य करायची व रात्रीचा प्रवास करून पुढे वाटचाल करायची .थंडीच्या दिवसात अंगावर फक्त काळे घोंगडे घ्यायची.
तिच्या कानावर फार पूर्वीपासून ' अनुभव मंटप' , म.बसवेश्वर,श्री अल्लम प्रभू यांची माहिती आली होती.त्यामुळे तिथे जाण्याची तिला आसक्तीच लागून राहिली होती.ती श्री क्षेत्र कुडल संगम च्या दिशेने प्रवास व वाटचाल करू लागली.
आणि तो दिवस उजाडला .सकाळच्या प्रहरी ' अनुभव मंडप ' ची नित्य विचारसभा चालू असताना श्री अल्लम प्रभू निरूपण करत होते आणि मंडपात एकूण 770 विद्वान चर्चेत सामील झाले होते.त्यावेळी दिगंबर अवस्थेतील महादेवी भर सभेत अवतरली व व्यासपीठाच्या समोर मधोमध येवुन उभी राहिली.तसे सर्वजण उठून उभे राहिले.श्री अल्लमप्रभू यांनी सर्वांना शांतपणे खाली बसण्यास सांगितले आणि महादेवी कडे पाहून म्हणाले,' आक्का ,तुला माझा नमस्कार असो.तू तुझ्या आसनावर विराजमान हो.आजपासून तू अनुभव मंडपची पहिली महिला सदस्या असून सर्व शरणांबरीबर तुलाही शरणी म्हणून मी मान्यता देवून या विचार कार्यात सामील करून घेत आहे.असे म्हणून त्यांनी तिला नमस्कार केला.आपल्याला थोरली बहिण ( आक्का ) असे संबोधून साक्षात श्री अल्लंम प्रभूंनी आपला गौरव केला व अशा अवस्थेतील स्त्री असून सुद्धा त्यांनी आपल्या शब्दांनी सर्वांच्या मनातील आपल्या बद्दलचा भाव बदलला याचा तिला खूप आनंद झाला.श्री अल्लंम प्रभू आणि तेथील विचारवंतांचे वैचारिक सौंदर्य पाहून ती आसनावर जावून बसली.
त्या दिवसापासून तिचे धार्मिक अध्यात्मिक कार्य आणखी वाढले व ती कुडल संगमेश्र्वराच्या भक्तीत रमून गेली.त्यातच ती तिच्या मनापासून मानलेल्या पतीस म्हणजेच श्री चन्न मल्लिकार्जुन, श्री शंकर महादेवास् पाहू लागली.श्री अल्लंम प्रभुं सारखा गुरु लाभला.आणि लहान भावा प्रमाणे मार्गदर्शन करणारे अनेक शरण भेटले.साहजिकच तिच्या कडून अनेक ग्रंथ व वचनांचे लेखन झाले. व त्यांचे निरूपण करण्याची संधी तिला अनुभव मंडप मध्ये मिळाली.
तिच्या वचनांचा अभ्यास करताना तिचे विचार आपणास पुढील प्रमाणे समजतात.
ती सांगते की,एकाच प्रकारच्या समुद्राच्या पाण्यात मीठ, गोटे,शिंपले व मोती आढळतात. लाटांशी संपर्क येवून येवून मीठ विरघळून जाते.दगडगोटे ,शिंपले झिजून नष्ट होतात.पण मोती रत्न मात्र तेजस्वी, साैंदर्य वान चकचकीत कठीण बनते.तसेच परमेश्वर व चांगले गुरु .भक्त व भाविक यांच्या सानिध्यात माणसांचे होत असते.मी अशा नवऱ्याची बायको आहे.जो कधी जन्मला नाही आणि त्याचा मृत्यू पण होणार नाही.साक्षात देव मल्लिकार्जुन माझा पती असून मी त्याची पत्नी आहे.मी मनापासून च्या भक्तिभावाने त्यालाच पती मानून त्याचाशी लग्न केले आहे.त्यामुळे शरीराने मला कोणी जरी प्राप्त केले तरी मनाने मी त्याच्या शिवाय कोणाची होऊ शकत नाही.माझ्या सुंदर शरीर कायेला मी काजळा ची किंमत देते.बाह्य स्वरूपात ती कितीही चकचकीत चमकली तरी माझ्या मनावर ती अधिकार गाजवू शकत नाही.माझ्या मनाचे सौंदर्य अप्रतिम प्रेमभाव असलेले आहे.अंगभक्ती पेक्षा मी लिंग भक्तीत रमणारी आहे.शिवलिंग माझा संसार आहे.पृथ्वी तत्व जलतत्वात,जल तत्व तेज तत्वात,तेज तत्व वायू तत्वात आणि वायू तत्व आकाश तत्वात विलीन होते.तसे सर्व पंचेंद्रियाच्या भावना भक्तिभावांत विलीन झाल्या पाहिजेत.माझ्या भक्ती भावाने प्रसन्न होऊन रोज मला सिद्ध रामेश्वर दर्शन देतो.तेच माझे बाळ आहे.
एकदा श्री अल्लंमप्रभू यांनी तिला भर दरबारात 770 शरणांसमोर प्रश्न केला की,तू पूर्ण नग्न दिगंबर अवस्था स्वीकारली आहेस तर मग इतका लांब केशसंभार शरीरावर धारण करून तू का वावरत आहेस? त्यामुळे तुझे सर्वांग झाकले जात आहे.
तेव्हा तिने अतिशय धाडसाने उत्तर दिले की,मी खूप सुंदर आहे.माझे एका स्त्रीचे रुपसाैंदर्य व मदन अंग पाहून तुमच्या सर्व पुरुष शरणींच्या भक्तीमध्ये अडथळा येईल. व मला तसे करून तुमची साधना खंडित करण्याची इच्छा नाही.अनेक दिवसांच्या प्रवासात माझे दाट केस खूप लांब गुढग्यापर्यंत वाढले. आहेत.आणि तेच माझे वस्त्र बनून माझे शरीर झाक तात.पिकलेले रसाळ फळ नुसते पाहून अथवा त्याचा नुसता तृप्ती गंध जरी जाणवला तर ते खाण्याची इच्छा होते त्यामुळे तुमची भक्ती साधना अडचणीत येईल.
वय वर्षे 18 ला महादेवी ते अक्कमहादेवी हा तिचा झालेला जीवनप्रवास, तिचे ज्ञान निरूपण थक्क करणारे आहे. भार ताच्याच नव्हे तर जगाच्या व पर्यायाने वीरशैव लिंगायत धर्माच्या इतिहासात हे असे एकमेव उदाहरण असेल जे निंदकासाठी वज्र प्रहार आहे तर शरणांसाठी फुलासाखे कोमल आहे. नसानसांत बंडखोर वृत्ती भिनलेले, ऊर्मी व कष्टाळू वृत्ती,कर्मकांड करताना सुशोभित दिखा वू पणा न करणारी,प्रेम या विश्वातील भावनेला उदात्त करणारी,पशू,पक्षी,निसर्ग यांना जवळ करून जन्म निसर्ग अवस्थेत राहणारी आणि समर्पित मधुरा भक्तीत अखंड ज्ञान पूर्ण जीवन व्यतीत करणारी एकमेव शरणी श्री अक्कमहादेवी . तिच्या धाडसी.बंडखोर , क्रांती प्रवण जीवन कार्यास आजच्या तिचा जयंती दिनी .. शिवशरणार्थ. जय बसवा.ओम नमः शिवाय !

No comments:
Post a Comment