श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी ची यात्रा शांततेत पार पडणार ग्रामस्थ विसापूर यात्रे ची नियोजन बैठक संपन्न
सातारा , दि.20 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
विसापूर, ता.खटाव, जि.सातारा.येथील आराध्य ग्रामदेवता श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांच्या वार्षिक यात्रे ची नियोजन बैठक नुकतीच बुधवार, दि.20 .04.2022 रोजी सकाळी 9 वा.सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देवी मंदिरात पार पडली.
यात्रे चा सर्वसाधारण कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.29.04.2022 रोजी रात्री 9 वा. किर्तन.
शनिवार दि.30.04.2022 रोजी सकाळी श्री देवीचा विधिवत अभिषेक.दुपारी बैलगाड्यां ची शर्यत,संध्याकाळी देवीचा गोंधळ झाले नंतर छबिना ,श्री देवीच्या मूर्तीची ग्राम फेरी.
रविवार , दि.1.5.2022 रोजी जंगी कुस्ती स्पर्धेचा आखाडा होईल.रात्री 9 वा. ऑर्केस्ट्रा.
अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देवीच्या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.दिलीप ढोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले
No comments:
Post a Comment