Monday, April 11, 2022

वडूज मधील श्री राम मंदिर मध्ये राम नवमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन



वडूज मधील श्री राम मंदिर मध्ये राम नवमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन 
 
सातारा, दि.10 - प्रा.अजय शेटे
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे आज रविवार दि.10 रोजी दु.12 वा.रामनवमी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी श्री राम जन्मकाळा चे औचित्य साधून श्री. राम जन्माचे किर्तन,भजन ,  फुलांचा कार्यक्रम,राम रक्षा स्तोत्र पठण असे एकत्रित कार्यक्रम होणार आहेत.दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून महाप्रसाद नैवेद्य व अन्न दान सर्व स्त्रीपुरूष महिला भक्तांतर्फे करण्यात येते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरो ना साथीमुळे  श्री राम नवमी  काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत फक्त पूजा पाठ करून साजरी करण्यात येत होती.
परंतु या वर्षी सर्व निर्बंध हटल्या मुळे सर्वांना उत्साह असून अतिशय आनंदाने श्री राम नवमी साजरी करण्यात येत आहे.त्यासाठी मंदिरात सर्व मूर्तींची पूजा करून  भरजरी वस्त्रे घालण्यात आली आहेत.फुले व लाई ट च्या रंगीबिरंगी माळांची सुशोभित आरास करण्यात आली आहे. सुगंधी द्रव्ये व अगर बत्तीचा  सुवासिक दरवळ चालू आहे.वातावरणात एकदम प्रसन्नता निर्माण झाली आहे. लाऊड स्पीकर वरून 'गीत रामायण' ऐकवले जात आहे.
व डू ज मधील श्री राम मंदिर मध्य कालीन असून दुमजली आहे.ते अतिशय स्वच्छ व रंग रंगो टी केलेले आहे.. अंतर्गत मंदिर संपूर्ण पणे लाकडी असून खांबावर कोरीव काम केलेले आहे.बाह्य स्वरूप दगडी व सिमेंट विटांचे आहे.मंदिर अतिशय सुस्थितीत व आकर्षक देखणे आहे. जमिन लहान कोटा फरशी तुकड्यांची आहे.मंदिराला मोठ्या लाकडी व लोखंडी गजांच्या खिडक्या असून भरपूर मोकळी हवा शुभ्र प्रकाश आत येतो.
मंदिरात प्रभू श्रीराम,लक्ष्मण, सीता यांच्या अतिशय सुबक रेखीव संगमरवरी मूर्ती असून त्यांच्या समोरच गाभाऱ्यात श्री हनुमानाची संगमरवरी सुबक रेखीव मूर्ती आहे.
मंदिर व इतर बाजूची मोकळी जागा यासाठी पूर्वीपासून श्री राम ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे.मंदिरात भटजी व सेवाभावी  भक्त यांचे मार्फत दररोज पूजा व आरती केली जाते.रोज सकाळी लाऊड स्पीकर वरून भक्ती संगीत ऐकवण्यात येते.जय श्रीराम !

Saturday, April 9, 2022

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील - महाराष्ट्र केसरी चा मानकरी


कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील - महाराष्ट्र केसरी चा मानकरी 
सातारा दि.9 - प्रा. अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी 
सातारा येथे झालेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
या स्पर्धेत अंतिम सामना कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यात झाला.
सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत विशाल बनकर चा 5.4 अशा गुणांनी पराभव केला.
या पूर्वीही पृथ्वीराज 95 किलो वजनी गटात ज्युनियर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदाचा मानकरी ठरला होता.तो भारतीय लष्करात हवालदार या पदावरही कार्यरत आहे.
या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्र व कुस्ती विश्वाचे लक्ष लागून राहिले होते.तब्बल 21 वर्षांनी कोल्हापूरला हा मान मिळाला आहे.आणि तो मिळवून देणारा पैलवान पृथ्वीराज पण केवळ 21  वर्षांचाच आहे. त्याला महाराष्ट्र केसरीची अतिशय मानाची  चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.त्यामुळे त्याच्यावर सर्वांकडून अभिनंदन व शुभेच्छा यांचा वर्षाव होत आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना साथी मुळे या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या.त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.महाराष्ट्र केसरी हि कुस्ती विश्वातील खूप मानाची स्पर्धा समजली जाते.या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मल्लांनी आपले नाव जागतिक स्तरावर गाजवून आपल्या महाराष्ट्र राज्याचा नाव मान वाढवला आहे. लिंगायत Tv live च्या परिवाराचे कडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा



Friday, April 8, 2022

गुरू शिष्य परंपरा सनातन आहे : श्री काशी जगद्गुरूपट्टा अभिषेकाच्या एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाचा शुभारंभ संपन्न



गुरू शिष्य परंपरा सनातन आहे : श्री काशी जगद्गुरू
पट्टाभिषेकाच्या एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाचा शुभारंभ
वाराणसी दि 5  : 
राजशेखर बुरूकुले प्रतिनिधी लिंगायत TV live
भारतीय संस्कृतीमध्ये गुरू शिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. ही परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत राहणार आहे. जगाला अपूर्व ज्ञान देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या श्वासोच्छवासातून चार वेद आणि वैखरीच्या उपदेशातून अठ्ठावीस आगमांची निर्मिती केली. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये वेद आणि आगमच महत्त्वाचे मानले जातात. आपल्या देशामध्ये जेवढी गुरू-शिष्य परंपरा आहे या सर्वांचे आदिगुरू शिवालाच मानले जाते. शिवाच्या पंचमुखातून प्रकट झालेले जगद्गुरू पंचाचार्यांनी या भूलोकात लिंगात अवतार घेऊन सनातन वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्यांनी सर्वांना शिवाचे ज्ञान पोहोचवण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये आपल्या अनेक शाखा मठांची स्थापना केली. परशिवाचे परमज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. काशीपीठसुद्धा अनादिकालापासून हे परमज्ञान सामान्य लोकांना देत आले आहे. हे कार्य निरंतर सुरू आहे. देवासमोर आपण अखंड ज्योत लावतो तसेच काशीपीठामध्ये ज्ञानाची अखंड ज्योत सनातन काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत चालत राहणार आहे. काशीपीठाची ज्ञानदान परंपरा निरंतर चालावी म्हणून आपल्या उत्तराधिकाराऱ्याचे पट्टाभिषेक करीत आहोत असे विचार काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशिर्वचनात सांगितले.
काशीपीठामध्ये नूतन पट्टाभिषेकाच्या निमित्ताने एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाच्या शुभारंभादिवशी दिव्य सान्निध्यस्थानी आशीर्वचन सांगताना हे विचार मांडले. 
https://youtu.be/LP3q7-DJ0U4


      या उद्घाटन समारंभामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, भारताचे उद्योगपती श्री. बाबासाहेब कल्याणी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव, उद्योगपती धर्मराज खेणी, प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अब्बेतुमकुरचे श्री ष.ब्र.डाॅ. गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी पंचाचार्य ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून  केले. 
       महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात आणि काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. डॉ. गंगाधर शिवाचार्य यांना 'शिष्यहृत्पद्मभास्कर:', बाबा कल्याणी यांना 'उद्यमरत्न', भगवंत खुबा यांना 'समाजसेवा भूषण', शिवराज पाटील यांना 'समाजसेवा रत्न', धर्मराज खेणी यांना 'धर्मभूषण', डॉ. संगमेश सौंदत्तीमठ यांना 'साहित्य भूषण', पंढरपूरचे सुभाष सिद्राम म्हमाणे यांना 'दान चिंतामणी', पुण्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ 'वैद्यरत्न' , बसवराज पाटील 'धर्मभूषण' अशा पदव्या देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना सर्व मान्यवरांनी काशीपीठ आणि जगदगुरू यांच्याविषयी ऋण व्यक्त केले.
       सकाळी सात पंचेचाळीसला अखंड दीपप्रज्वलन करून काशी जगद्गुरू आणि उत्तराधिकारी या दोघांनी  रुद्राभिषेकाचा प्रारंभ केला. शादनगर गुरुकुलच्या पस्तीस विद्यार्थांनी अतीरुद्राचा शुभारंभ केला. दुपारी सर्वांनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुकुलचे वेद प्रा. मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वेदघोष केला. बार्शी दहिवडकर मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य यांनी मंगलस्तोत्र गायले. या कार्यक्रमाला पुण्याच्या विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. अनिल भरतशेठ गाढवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी यांच्यासह सर्व संचालक तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि भारतातील विविध प्रांतातील हजारो भक्तगण, काशीपीठाचे वीरशैव विद्वत् संघाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पुण्याचे पत्रकार श्री विद्याधर ताठे यांनी केले.

 या वेळी उपस्थित मान्यवर : खासदार उमेश जाधव, अब्बेतुमकुर मठाधिपती, उत्तराधिकारी मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी, विरक्त मठाचे बसव जयचंद्र स्वामीजी, काशी जगद्गुरू, शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, उद्योगपती बाबासाहेब कल्याणी

सातारा येथे उद्या शिवदिक्षा सोहळ्याचे भव्य आयोजन


सातारा येथे उद्या शिवदिक्षा सोहळ्याचे भव्य आयोजन
सातारा, दि. 8 - प्रा.अजय शेटे, प्रतिनिधी
श्रीमद जगद्गुरू पंचाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने, वीरशैव लिंगायत समाज धर्म प्रचार व प्रसार अभियान अंतर्गत -  जंगम समाज,वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत समाज महिला भजनी मंडळ ,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दि.10 .04.2022 रोजी सकाळी 8 ते दु.3 या वेळेत  सद्गुरू 108 ज्ञानभास्क र महादेव शिवाचार्य महाराज ,श्री क्षेत्र वाई मठ संस्थान यांचे दिव्य सानिध्यात शिवदिक्षा संस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम प.पू.गुरु औंधकर महाराज मठ ,11,बुधवार पेठ,सातारा येथे होणार आहे.
सदर भव्य शिवदिक्षा संस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.सकाळीं 7 वा.विधी विधान पूजन , स.9 वा.इष्ट लिंग पूजन व पात्री 
महाभिषेक, स.11 वा.शिवदिक्षा संस्कार, स.12 वा. आशिर्वचन.
सदर दिक्षा विधी साठी  दोन नारळ,एक नवीन टॉवेल, एक किलो तांदूळ या प्रमाणे साहित्य व रु.251/- ( रु.दोनशे एक्कावन्न फक्त ) रोख देणगी लागणार आहे. 
तरी सदर कार्यक्रमास सर्व शिवदिक्षा इच्छुक साधक व भाविक भक्त यांनी सह कुटुंब सहपरिवार वेळेत उपस्थित रहावे अशी विनंती समस्त समाज मंडळी तर्फे करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी अध्यक्ष मा. मु.सोमनाथ स्वामी 9149805212,उपाध्यक्ष मा. मु.जितेंद्र स्वामी 9527132033,कार्याध्यक्ष मा.  मु. प्रविण जंगम 9822156473, मा. मु.योगेश जंगम, वेळे कामठी 9657436389. मा. मु.बाबुराव जंगम आचार्य , केळघर 9860929911, मा. मु.निलेश जंगम ,शिवपुरी 8805226813, मा. मु.समाधान जंगम, भाट मरळी 9823150995, मा. मु.विजय जंगम,नागठाणे 9823230137, मा. मु.आकाश जंगम, भाट मरळी 7972151961, मा. मु.धर्मेंद्र जंगम आचार्य, मेरुलिंग 9960008003 यांचेशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमात दानशूर श्री.राजेंद्र बळीराम देशमाने व परिवार, तारगाव यांचेतर्फे महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात येणार आहे. व विशेष सहकार्य श्री.दत्तात्रय धुरपे व परिवार,श्री पंचमुखी पूजा साहित्य,सातारा यांचे राहणार आहे.
सदर कार्यक्रमाला सर्व कार्यकारिणी सदस्य व समाज बंधू भगिनी , जि.सातारा यांचे सर्व सहकार्य राहणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या दिव्य दिक्षा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

Wednesday, April 6, 2022

लिंगायत समाजाचे युवा नेते मा. प्रदिप जी साखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लिंगायत समाजाचे युवा नेते मा. प्रदिप जी साखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
सातारा दि 5 :- 
प्रा अजय शेटे
लिंगायत समाजाचे युवा नेते मा. प्रदिप जी साखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 कोपरगाव येथील प्रसिद्ध युवा उद्योजक व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे युवा आघाडी अध्यक्ष, अभ्यासू मनमिळावू ,सुस्वभावी ,महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील लिंगायत समाज नेत्यांच्या ,उद्योजकांच्या,उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात असलेले कृतिशील युवा नेते प्रदिपजी साखरे साहेब यांना वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही च्या वतीने  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा.

Tuesday, April 5, 2022

सुपर वुमन अश्विनी ते सुपरमॅन अंश एक धाडसी परिवर्तन पत्रकारिता मध्ये जपले आपले वेगळेपण अर्थात ती चा बनला तो.. सर्वांनी केले अभिनंदन


सुपर वुमन अश्विनी  ते सुपरमॅन अंश एक धाडसी परिवर्तन अर्थात ती चा बनला तो.. पत्रकारिता क्षेत्रात ही जपले आपले वेगळेपण, सर्वांनी केले अभिनंदन 
सातारा, दि.5 - प्रणाली वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV live 
 मु.पो.तोंडोली ,ता. कडेगाव , जि.सांगली येथील  लहानपणा पासून मुलांप्रमाणे शारीरिक हालचाल व हावभाव असणाऱ्या अश्विनी या मुलीने लिंग बदल शस्त्र क्रिया करून घेवून आपले रूपांतर अंश नावाच्या मुलात  करण्यास सुरुवात केली आहे.   तिच्या प्रत्येक कृतीतून पुरुषी देहबोली प्रकर्षाने जाणवत असे.तिचा पोशाख,बोलणे,चालणे, करारी निडरपणा यातून ती पटकन मुलगाच असावा असे भासत असे.
  या सर्व बाबी लक्षात घेवून नुकताच तिने लिंग परिवर्तनाचा धाडसी निर्णय घेतला व त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले.संबंधित तज्ञ डॉक्टरां च्या कडून तिने शस्त्र क्रियेचा पहिला टप्पा पार पाडला आहे.
  तिच्या या धाडसी निर्ण या ला तिचे आई वडील,भाऊ, वहिनी यांनी भक्कम पाठिंबा दिला .त्यामुळे कायदेशीर,वैद्यकीय,मानसिक व शारीरिक  प्रक्रिया पूर्ण करून तिने आपल्या लिंगायत समाजात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
  मला माझ्या कुटुंबाने व सहकारी वर्गाने मोलाची साथ दिल्यामुळेच आपण हे धाडसी कार्य करू शकलो.असे अंश ने यावेळी  सांगितले.
  तसेच अंश चे स्वतः चेच अँडव्हांस न्यूज नावाचे डिजिटल चॅनल असून त्याने स्वतःबद्दल चीच क्रांतिकारी अँड व्हांस न्यूज देवून पत्रकारिता क्षेत्राचे नाव पण चर्चेत आणले आहे.असे सर्वत्र बोलले जात आहे. व त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Friday, April 1, 2022

लिंगायतांना स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा - मा.खा.धैर्यशील माने


 लिंगायतांना  स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा - मा.खा.धैर्यशील माने 
  
सातारा,दि.1- रमेश कुमार मिठारी
आज लोकसभेत हातकणंगले मतदार संघाचे खासदार  धैर्यशील  माने, दादा यांनी लिंगायत धर्मास  स्वतंत्र संविधनिक धर्म  मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा म्हणून मागणी केली.
      संपूर्ण देश तसेच दक्षिण भारता मध्ये लिंगायत  बांधव मोठ्या प्रमाणात असून त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे.
    अशा या लिंगायत धर्माची स्थापना म.बसवेश्वर यांनी ई. स.बाराव्या शतकात करून अनुभव मंडप नावाची सर्व जाती,धर्माची लोकसंसद चालविली.
    इंग्रज काळात सन 1941 पर्यंत या धर्माला अल्पसंख्य दर्जा होता.परंतु नंतर तो काढला. आता नव्याने ही मागणी पूर्ण व्हावी अशी या समाजाची बऱ्याच वर्षाची  न्यायिक मागणी असून ती केंद्र व राज्य सरकारे  यांनी पूर्ण करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी.
    असे सांगून त्यांनी संपूर्ण देश व सभागृहाचे लक्ष या समस्ये कडे  वेधले.त्याबद्दल लिंगायत टिव्ही व समस्त समाजातर्फे त्यांचे  अभिनंदन व आभार

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...