कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील - महाराष्ट्र केसरी चा मानकरी
सातारा दि.9 - प्रा. अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
सातारा येथे झालेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
या स्पर्धेत अंतिम सामना कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यात झाला.
सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत विशाल बनकर चा 5.4 अशा गुणांनी पराभव केला.
या पूर्वीही पृथ्वीराज 95 किलो वजनी गटात ज्युनियर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदाचा मानकरी ठरला होता.तो भारतीय लष्करात हवालदार या पदावरही कार्यरत आहे.
या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्र व कुस्ती विश्वाचे लक्ष लागून राहिले होते.तब्बल 21 वर्षांनी कोल्हापूरला हा मान मिळाला आहे.आणि तो मिळवून देणारा पैलवान पृथ्वीराज पण केवळ 21 वर्षांचाच आहे. त्याला महाराष्ट्र केसरीची अतिशय मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.त्यामुळे त्याच्यावर सर्वांकडून अभिनंदन व शुभेच्छा यांचा वर्षाव होत आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना साथी मुळे या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या.त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.महाराष्ट्र केसरी हि कुस्ती विश्वातील खूप मानाची स्पर्धा समजली जाते.या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मल्लांनी आपले नाव जागतिक स्तरावर गाजवून आपल्या महाराष्ट्र राज्याचा नाव मान वाढवला आहे. लिंगायत Tv live च्या परिवाराचे कडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
No comments:
Post a Comment