Sunday, October 3, 2021

** जनसुराज्य शक्तीचा उद्गाता आणि लिंगायत समाजाचा बुलंद आवाज मा आमदार डॉ विनयजी कोरे सावकार **







** जनसुराज्य शक्तीचा उद्गाता आणि लिंगायत समाजाचा बुलंद आवाज मा आमदार डॉ विनयजी कोरे सावकार *लिंगायत TV live  दि 4 :- विशेष प्रतिनिधी ..प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239.
.. वारणा नगर चे आमदार मा.डॉ.विनय जी कोरे यांचा आज वाढदिवस ..त्यानिमित्त त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन **
.. मा.सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांचे नातू म्हणून मा. आ.डॉ.विनय जी कोरे संपूर्ण महाराष्ट्र व भारताला परिचित आहेत..
..आपल्या आजोबांच्या पथ ध्येयावर पाऊल ठेवत . मा.विनय जी कोरे संपूर्ण वारणा खोऱ्याचे नाव संपूर्ण जगभरात उज्वल करण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत..
..राजकारणा मध्ये आपली स्वतःची विचारधारा ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी जनसुराज्य शक्ती नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना स्वतःच्या हिमतीवर करून दाखवली आहे..
..आपल्या कुटुंबाने दिलेल्या संस्काराची जाणिव ठेवून त्यांची व पुढील पिढीची वाटचाल त्यांनी प्रगतीपथावर चालूच ठेवली आहे..
.. देव जोतिबा देवाची भक्ती.. आशीर्वाद  व राजर्षी  शाहू महाराजांचा आदर्श यांच्या जोरावर वारणा नगरला सहकार क्षेत्राचे रोड मॉडेल बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.. कुस्ती सारख्या रांगड्या खेळाला त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेवून ठेवले. व कोल्हापूरची कुस्ती सातासमुद्रापार पोहचवली.. व महाराष्ट्रातून मोठे पैलवान तयार करण्यास हातभार लावला..
..त्यांच्याच देखरेखी खाली आज वारणा दूध संघ..सहकारी साखर कारखाना..बँक..फार्मसी व मेडिकल कॉलेज..कृषी महाविद्यालय.. इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज..इंग्लिश अकादमी.. मिलिटरी अकादमी..कोडोली हायस्कूल..सह्याद्री कुकुट पालन संस्था.. वारणा ब झा र.. ला.शास्त्री भवन..आंतरराष्ट्रीय कुस्ती व कृषी प्रदर्शन.. वारणा महिला गृह उद्योग.. आंतरराष्ट्रीय व्यापार विनिमय..यांचे कार्य नित्यनेमाने प्रगती पथावर चालू आहे..
..शिक्षण हि महान अशी सामाजिक गुंतवणूक आहे .आणि ती त्यांनी वारणेच्या खोऱ्यात यशस्वी कारण दाखवली..हरितक्रांती कशी असावी हे वारणेला जाऊनच प्रत्यक्ष अनुभवावे..नवमहाराष्ट्र घडवताना समृद्धी चे ध्येय काय असावे..शेतकऱ्यांची मुले शिकली तर काय चमत्कार करू शकतात..?..सहिष्णुता..उत्तम नेतृत्व..घरंदाज संस्कार..संकल्प सिद्धी.. व जनकल्याण तळमळ हे सर्व आपल्याला वारणा खोऱ्याच्या प्रगतीवरून दिसून येते..
..बळीराजाच्या कष्टाला योग्य वाव मिळाला तर सहकाराची गंगोत्री कशी सर्वांना समृद्ध करते. हि किमया विश्वाला दाखवून देणाऱ्या मा.आमदार डॉ.विनय जी कोरे साहेब यांना आजच्या या वाढदिना दिवशी हार्दिक शुभेच्छा *"
..लिंगायतांचा बुलंद आवाज, 
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे मार्गदर्शक, 
वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष लोकनेते आ. मा. विनयजी कोरे साहेब (सावकार ) 
यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 💐🎂
            प्रदीप साखरे 
🔸वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन🔸लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र, लिंगायत  TV Live

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती
लातूर दि प्रतिनिधी :- 
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड.राणीताई स्वामी गेली अनेक वर्षे झाले संघटनेचे काम करत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी त्यांना महाराष्ट्राच्या लिगल डिपार्टमेंट च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर त्यांची निवड करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.राणीताई या एल.एल.बी.पास असुन त्यांचे एल.एल.एम चे शिक्षण सुरू आहे.त्या समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात.संपूर्ण महाराष्ट्रभर त्या संघटनेचे कामकाज कशाप्रकारे तळागाळापर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करत असतात.ही संघटना आज दिली रजिस्टर आहे.ग्रामीण भागात दारूबंदीचा विषय असेल,महिला सक्षमीकरण असेल यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्य सुरू आहे.आणि हे पोहोचविण्याचे काम ॲड.राणीताई स्वामी मोठ्या प्रयत्नाने करत आहेत.त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Saturday, October 2, 2021

विरोधकांना कोलांटउड्या मारणारांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची वेळ यु टी जाधव चेअरमन सां जि प्राथ. शिक्षक बँक


विरोधकांना कोलांटउड्या मारणारांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची वेळ
 यु टी जाधव चेअरमन सां जि प्राथ. शिक्षक बँक
सांगली दि 2 :-  प्रतिनिधी 
उमेश पाटील 
  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विरोधी नेते व संचालकांचे खोटे बोल पण रेटून बोल हा फंडा वारंवार उघड होत असल्याने त्यांच्यावरील सभासदांमधील विश्वासाहार्यता कमी होऊ लागल्याने त्यांनी आता इतर संघटनांतून कोलांटउड्या मारून शिक्षक बँकेवर संचालक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हवेत बार काढण्याचे तंत्र अवलंबले आहे.

परंतु शिक्षक बँकेचे सभासद सुज्ञ व जागरूक आहेत. त्यांना हिताचा कारभार करणारी व सभासदांच्या उन्नतीबरोबर समाजात कामधेनूची उंची वाढविण्याचे काम शिक्षक समितीच करू शकते. हा विश्वास सार्थ ठरल्याने सत्तेसाठी वाट्टेल ते बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधी सक्रिय टोळीचा बंदोबस्त त्यांच्या कर्मानेच होणार आहे.

सर्व कर्जावरील व्याजदर टप्प्या टप्प्याने कमी करणे, टप्प्या टप्प्याने डिव्हीडंट वाढविणे, दुर्दैवी शिक्षक सभासदांच्या कुटुंबास वरदायणी ठरलेली मृत संजीवनी योजना, वैद्यकीय मदत, एटीएम, आरटीजीएस, एन ई एफ टी, कोअर बँकिंग प्रणाली, असे अनेक निर्णय घेण्यात आम्ही यशस्वी झाल्याने

सामान्य सभासदात, जनमानसात , व सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात सांगली शिक्षक बँकेची प्रतिमा कामधेनू म्हणून उंचावली आहे. त्याचा सार्थ अभिमान आमच्यासह जिल्ह्यातील सभासदांना आहे.त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्हयातून सांगली शिक्षक बँकेचे स्वागत करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बांधव आसुसलेले आहेत.

ज्यांनी नेहमीच शिक्षक बँकेवर शिंतोडे उडवण्यासह ,सोलापूरकर सभासदांचा  द्वेष केला तेच आता मताच्या जोगव्यासाठी पायघड्या घालू लागले आहेत. परंतु तुमची आजपर्यंतची रणनीती त्यांनी ओळखली असुन योग्य वेळेची वाट पाहात आहेत. 

त्यामुळे सांगली जिल्हयातील विरोधी गटात बेडुक उड्या मारून सामील झालेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांनी जरा सबुरीने घ्यावे व तुमच्या संचालक व नेतेमंडळींना तोंड उघडायला सांगावे. आम्हाला केले जाणारे सवाल त्यांनाच करा तुम्हाला तेच उत्तर देतील.विनाकारण तुमचे खांद्ये झिजवु नका.
यावेळी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, व्हा . चेअरमन राजाराम सावंत, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, रमेश पाटील, सुनिल गुरव, महादेव माळी, शिवाजी पवार, श्रेणिक चौगुले, अर्चना कोळेकर, सदाशिव पाटील, श्रीकांत माळी, हरिबा गावडे, बाळासो आडके आदी संचालक उपस्थित होते.

दत्तवाड मध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा


दत्तवाड मध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा
दत्तवाड दि  2  :- प्रतिनिधी  रमेश मिठारी

     कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड  येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसो चौगुले व बंडा परीट यांच्या विशेष प्रयत्नाने दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ वयोवृद्ध श्रीमती ताराबाई दत्ता पुजारी वय 96 वर्षे, दस्तगीर इमाम पाकजादे वय वर्षे 92 व मारुती महादेव सूर्यवंशी वय वर्षे 85 अशा या ज्येष्ठांचा सत्कार सरपंच  चंद्रकांत कांबळे व प्राध्यापक जे. पी. जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्राध्यापक जे पी जाधव सर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले आज समाजात ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे व त्यांच्या आरोग्याच्या सोयी चांगल्याप्रकारे होण्याकरता यासाठी घरातील कुटुंबांनी योग्य प्रकारे त्यांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे कारण त्यांच्या वयोवृद्ध मुळे व वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात शारीरिक व्याधी साठी वैद्यकीय उपचारांची गरज या वयात असते कारण म्हातारपण हे नैसर्गिकतेने बहाल केलेले दुसरे बालपण होय त्याकरिता ज्येष्ठांचे ही शारीरिक व मानसिक आणी आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करून आपला आयुष्य जास्तीत जास्त कशा प्रकारे टिकवावा याबद्दल महत्वपूर्ण माहिती या कार्यक्रमावेळी दिले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच चंद्रकांत कांबळे प्राध्यापक जे.पी. जाधव सर, बाबा महाराज मठाचे श्री भालचंद्र पाटील ,ग्रामपंचायत सदस्य नूर काले, श्री शशिकांत उपाध्ये ज्येष्ठ पत्रकार रमेशकुमार मिठारे व मिलिंद देशपांडे आदी मान्यवरांसह माजी सरपंच कुबेर कल्लाप्पा कमते दत्तात्रय सुतार सुभाष शेंडगे, गुलाब अली मुल्ला, मारुती कुंभार, विष्णू खरपी आणि धनपाल सुरवंशी आधी ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रमेशकुमार मिठारे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक भाऊसो चौगुले व आभार बंडा परीट यांनी केले


Friday, October 1, 2021

मिरज दंगलीतील संशयितांवर गुन्हे मागेमिरज दंगलीतील १०६ जणांवरील गुन्हे मागेजिल्हा न्यायालयाचे आदेश ः सामाजिक सलोख्यासाठीचा शासन प्रस्ताव मान्य


मिरज दंगलीतील संशयितांवर गुन्हे मागे
मिरज दंगलीतील १०६ जणांवरील गुन्हे मागे
जिल्हा न्यायालयाचे आदेश ः सामाजिक सलोख्यासाठीचा शासन प्रस्ताव मान्य


सांगली दि  2 :- 
प्रतिनिधी उमेश पाटील 

 मिरजेत सन २००९ साली झालेल्या दंगल प्रकरणी संशयित १०६ जणांचे गुन्हे मागे घेण्यात आले. सामाजिक सलोखा रहावा यासाठी गुन्हे मागे घ्यावेत, असा प्रस्ताव राज्य शासनाने दिला होता. तो जिल्हा न्यायालयाने मान्य केला. यात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झालेले माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, विकास सुर्यवंशी, सुनिता मोरे, राष्ट्रावादीचे अभिजीत हारगे, शाहिद बेपारी, इम्रान नदाफ यांचा समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी याबाबतचा आदेश दिला.
अधिक माहिती अशी, की मिरज येथे गणेशोत्सव काळात वादग्रस्त कमान उभी करण्याच्या कारणातून दंगल उसळली होती. तीत पोलिस व नागरिकांवर दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे दीड लाखाचे नुकसान केल्याबद्दल १०६ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यात माजी महापौर बागवान हे मुख्य सूत्रधार असल्याचा खुलासा खुद्द तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी केला होता.
गेल्या बारा वर्षांपासून या प्रकरणात खटला सुरु आहे. हा खटला मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि न्यायालयाकडे याबाबत परवानगी मागितली. सत्र न्यायालयाने दाखल खटले मागे घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे १०६ जणांवरील आरोप रद्द केले. संशयितांकडून अशा प्रकराचे कृत्य पुन्हा झाले नाही. सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय गरजेचा आहे, असे शासनाने प्रस्तावात म्हटले होते. आरोपींनी केलेले विशिष्ट कृत्य व त्यांचा सहभाग स्पष्ट होत नाही. केवळ साक्षीच्या आधारावर आरोपी दोषी ठरवण्याची शक्यता नाही. रेकॉर्डवरील कागदपत्रे व पुरावे पुरेसे नाहीत. आरोपीवर खटला चालवल्याने सार्वजनिक शांततेस बाधा येइल म्हणून खटला मागे घेऊन आरोपींना मुक्त करण्याची विनंती मान्य करण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
साक्षीदारांनी या प्रकरणात नावे सांगितली, मात्र प्रत्येक संशयिताची विशिष्ट भूमिका सिद्ध झाली नाही. दंगलीत सहभागी झालेल्या व्यक्तीनी पोलिस कर्मचारी व जनतेवर दगडफेक केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. आरोपींनी नुकसानीची एक लाख ६० हजार रुपये रक्कम जमा केली आहे, असा उल्लेख आदेशात आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. मिरज दंगलीच्या गुन्ह्यात यापूर्वी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, नगरसेवक पांडूरंग कोरे यांच्याविरुद्ध दाखल खटले २०१७ मध्ये शासनाने मागे घेतले आहेत. 

मा. पवार साहेबांच्या कार्याला कलेद्वारे अभिवादन पत्रकार विनायक चिवटे यांचे सुपुत्र चि.दिग्विजय याची कलाकृती


 मा. पवार साहेबांच्या कार्याला कलेद्वारे अभिवादन पत्रकार  विनायक  चिवटे यांचे सुपुत्र  चि.दिग्विजय याची कलाकृती
..सोलापूर दि.29..आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री व नामदार श्री शरदचंद्र पवार साहेब 
यांच्या राजकीय कार्याला एका बाल कलाकाराने आपल्या अंगभूत कलेद्वारे अभिवादन केले आहे.
..लिंगायत टि. व्ही.चॅनेल चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे सुपुत्र चि.दिग्विजय हा उत्तम चित्रकार आहे.आपल्या या अंगभूत कलेच्या द्वारे त्याने मा.शरदराव जी पवार साहेबांचे एक सुंदर पेन्सिल रेखाचित्र बनवले आहे.त्यामुळे हे चित्र सध्या येथे अतिशय कौतुकाचा विषय बनले आहे.
.. चि.दिग्विजय हा करमाळा येथील रहिवाशी असून तो कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात ई.आठवीच्या वर्गात शिकत आहे.
.. सदर रेखाटलेले चित्र मा.पवार साहेब यांचे पर्यंत पोहचविणे चा त्याचा मानस आहे..

https://youtu.be/tGhq2BHSfIA
लिंगायत समाजाचे हक्काचे व्यासपीठ
 📡 *लिंगायत TV Live* 📹

लिंगायत टिव्ही लाईव्ह चॅनल साठी जिल्हा ,तालुका आणि शहर  प्रतिनिधी ,पत्रकार
नियुक्ती करण्यात येणार आहे तरी या क्षेत्रात काम करू इच्छुकांनी व समाज कार्याची आवड असलेल्या बंधुभगिनी यांनी  संपर्क साधावा व या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे हि विनंती🙏
 *ईमेल: lingayattv@gmail.com* 
 *whatsap मोबाईल:  8698002755* 
 🔸 *लिंगायत TV live हे चॅनेल* *like आणि subscribe  करा* 🔸


लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान, बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब यांचा स्तुत्य उपक्रम

लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान, बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब  यांचा स्तुत्य उपक्रम
 ..नांदेड दि.२९ प्रतिनिधी प्रा अजय शेटे
..बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब यांनी लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान देवून भू - दानाचे महान पुण्यकर्म प्राप्त केले आहे..
..या महत्त्वाच्या ठिकाणच्या जागेची किंमत जवळ जवळ साठ लाख रुपये आहे.केवळ बस व 
स मितीची निष्ठा व बस व भक्ती डोळ्यासमोर ठेवून मा. पटणे साहेबांनी हि जागा कायदेशीर रित्या समितीच्या नावे केली आहे.आगामी काळात लवकरच  या जागेवरच नवीन अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येईल.असे समिती तर्फे स्पष्ठ करण्यात आले..
..या समिती द्वारे देव..देश.. व..धर्मासाठी समर्पित होणाऱ्या शरणांची फळी आम्ही निर्माण करू व राष्ट्र आणि राष्ट्र धर्म  सर्वतोपरी मानून मानवतेच्या कल्याणासाठी आमची संस्था कटिबद्ध राहील.असेही समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
..आज रोजी आदर्श शिक्षक व जयराम अंबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक मित्र मा.चंद्रकांत पाटील .. साव ळीकर यांच्या सेवा निवृत्तीच्या अनुषंगाने येथे  नियोजित अनुभव मं ट पा च्या फलकाची उभारणी करण्यात येवुन पूजन करण्यात आले..
..या प्रसंगी अंतर भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार मा. गंगाधरजी पटणे साहेब..महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक मा.डॉ.गोविंद नांदे डे..शिक्षण विस्तार अधिकारी मा.शिरीष आळं दे..राष्ट्रवादी काँग्रेस चे बिलोली तालुका अध्यक्ष मा.नागनाथ पाटील सावळी कर.. बस व अनुभव मं ट प समितीचे अध्यक्ष मा.हणमंत आप्पा औ रा दे..ज्येष्ठ मार्गदर्शक मा.शिव हार पाटील ताक बीड कर..राष्ट्रवादी काँग्रेस चे नायगाव तालुका कार्याध्यक्ष मा.श्याम भाऊ चौंडे ..युवा प्रबोधनकार मा.बसवराज गुडपे दे गावकर .. मित्रवर्य मा.केशवजी पांडा ग ळे..उपस्थित होते..
.. मा. पटणे साहेबांच्या या दातृत्वा चे समितीचे सचिव मा.शिवानंद है ब त पुरे यांनी स्वागत करून आभार मानले .

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...