Friday, September 9, 2022

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मोठ्या अंतकरणाने श्रीगणेशाचे विसर्जन.

 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मोठ्या अंतकरणाने श्रीगणेशाचे विसर्जन.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मोठ्या अंतकरणाने श्रीगणेशाचे विसर्जन.


देगलूर( दि.१०) तालुका प्रतिनिधी:शिवानंद उप्पे.लिंगायत TV Live 

३५४ दिवस श्रीगणेशाचे आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त श्रीगणेशाची अकरा दिवस मोठ्या थाटामाटाने श्रीगणेशाच्या आगमनापासून ते अनंत चतुर्थीच्या दिवशी पर्यंत श्रीगणेशासमोर रंगरंगोटी पुजापाठ करण्यात येतो परंतु श्रीगणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी मात्र मोठ्या अंतकरणाने श्रीचे विसर्जन केले जाते.

     अशाच पद्धतीने हणेगाव येथील शिव छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने खुप सुंदर देखावा सादर करीत छत्रपती शिवाजी महाराज,माता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शंभू राजे,संत सेवालाल महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एक भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. 


यावेळी शिवछत्रपती गणेश मंडळ जय वाल्मिक गणेश मंडळ देशमुख गणेश मंडळ अष्टविनायक गणेश मंडळ सिद्धेश्वर गणेश मंडळ आदींनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता यावेळी विविध गणेश मंडळाच्या वतीने विविध देखावे सादर करण्यात आले होते. तर यावेळी शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक कार्य केलेल्या सर्व महामानवांचे या मिरवणुकीमध्ये तैलचित्र लावण्यात आले होते.आदि महामानवांचे तैल चित्राची मिरवणूक काढून यावेळी समाजाला सामाजिक समानतेचा संदेश देण्यात आला तर विविध गणेश मंडळांनी विविध देखावे सादर करून समाज एकतेचा प्रतिक देत होते यावेळी मिरवणूक हणेगावच्या मुख्य बाजारपेठेतून काढण्यात येऊन बस स्टॅन्ड ते हणेगाव येथील तलावात विसर्जन करण्यात आले,तर यावेळी मरखेल पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

       यावेळी मरखेल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जायभाये पोलीस उपनिरीक्षक बीट जमादार अब्दुल बारी पोलीस सी.बी.पांढरे जी.एच.जोगपेठे एच.पी.यंगाले आर.यु.लोखंडे व अनेक पोलीस बांधवांनी या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आले तर यावेळी सर्व मिरवणूक शांततेमध्ये पार पाडण्यात आली.

      या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व युवक हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला यशस्वी केलं यावेळी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी अंगद कुठले सचिन जाधव मनोज पाटील हत्ते अमोल,मयूर पाटील,राजू गुडलिंगे,सुधाकर नाईकवाडे अरविंद औटी महेश वाले पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महादेव उप्पे पत्रकार फारुख पटेल दैनिक मराठवाडा केसरी लोकप्रश्नचे पत्रकार व दैनिक सकाळचे उमाकांत पंचगले व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...