Tuesday, September 6, 2022

हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज व वडूज शहर मध्ये गणेशोत्सव उत्साहात

  हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज व वडूज शहर मध्ये गणेशोत्सव उत्साहात 


हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज व वडूज शहर मध्ये गणेशोत्सव उत्साहात 



वडूज , दि.7 - प्रा.अजय शेटे.लिंगायत TV Live 

गेल्या दोन वर्षापासून  कोरोना साथीमुळे बंद असलेला सार्वजनिक गणेशोत्सव या वर्षी मात्र सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये सन 2022.23 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी गणेश  उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे.




प्राचार्या नयना गंभरे,उपप्राचार्य महेश गोडसे, कार्याध्यक्ष विवेक पवार,खजिनदार जालिंदर धुळप,ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.एस. बी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम नियोजित पद्धतीने होत आहे.

बुधवार दि.31 श्री गणेश चतुर्थी दिवशी श्रींची मुर्ती प्रा.संजय कुंभार यांच्या गणेश स्टॉल वरून आणून शाळा संकुलात  उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे यांच्या हस्ते व अंबादास भंडारे सर यांच्या पौराहित्याखली विधिपूर्वक स्थापन करण्यात आली.या श्री गणेशाची दररोज सकाळ - संध्याकाळ दोन वेळा वेगवेगळ्या वर्ग तुकड्या तर्फे पवित्र  रांगोळी काढून पूजाविधी व आरती करण्यात येवून अतिशय सात्विक असा प्रसाद वाटप करण्यात येतो. त्यासाठीचे पौराहित्य किरण कांबळे सर् यांचे तर्फे करण्यात येते.




 सदर विद्यार्थी गणेशोत्सव साठी शाळा संकुला तर्फे  श्री गौरी पूजन करण्यात आले असून स्थापना करण्यात आली आहे. सौ.उज्वला माने व वर्षा भोसले मॅडम पूजाविधी पहात आहेत. गुरुवार दि.8 रोजी दु.3 ते संध्या.7 वाजेपर्यंत पालक वर्गासाठी हळदी - कुंकू  व पान - सुपारी समारंभ ,रांगोळी व चित्रकला  प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

तसेच गणेशोत्सव उत्साहात होणे साठी गीतगायन, गझी नृत्य,लेझिम,झांज पथक ,रेकॉर्ड डान्स अशा वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन पण करण्यात आले आहे.

या कामी म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शितल शिंदे, विजया खराडे,देशपांडे मॅडम,थोरात मॅडम , भुजबळ मॅडम,गवळी सर्,प्रेरणा पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लोहार मॅडम, माया म्हामणे,यादव मावशी,दिपाली टाकणे यांचे सहकार्य लाभत आहे.


या कार्यक्रमात शिवांश कला अकादमी, बार्शी चे शाहीर नवनाथ साळवे यांच्या सोंगी 

भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात पंकज पवार सर् यांनी आपल्या लोकगीताने बहार आणली.

तसेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम पण अतिशय उत्साहात झाला.उच्च न्यायालय सदस्य सतीश शेटे,नितीन जाधव,गोविंद भंडारे यांनी श्री ची आरती करून शिक्षक दिनाची  शुभेच्छा पत्रे शिक्षकांना देवून त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमात कै.विनायक मेटे,सायरस मिस्त्री,डॉ.प्रसन्न भंडारे यांच्या अपघाती मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

गणेश उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी गोवर्धन धोत्रे,विजय खुडे,योगेश डोंगरे, लिना लंगडे मॅडम,रमेश खुडे,श्रीरंग दुबळे,हणमंत पाटोळे,सुहास  माळी, रोहित मदने,वायदंडे यांचे  उत्तम सहकार्य लाभत आहे.

सौ.गायत्री भंडारे मॅडम,मुजावर सर्,मुल्ला मॅडम सर्व नवीन शिक्षक - शिक्षिका, वडूज शिक्षण विकास मंडळ. यांचेही उत्तम सहकार्य लाभले आहे.  

तहसील कार्यालय,खटाव , वडूज.तर्फे तहसीलदार मा.किरण जमदाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी मा. निलेशजी देशमुख,पोलीस इन्स्पेक्टर मा. मालोजीराव देशमुख, सपोनी दिक्षित साहेब यांनी श्री गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या बैठका घेवून, मागील अक्षय तृतीया, म.बसवेश्वर जयंती,शिवजयंती,

 ईद, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमा प्रमाणेच याही गणेश उत्सवात ' गुड गव्हर्नन्स ' दाखवून चोख बंदोबस्त ठेवला आहे.त्यांना श्री. दिपक देवकर,प्रकाश इंगळे,शांतीलाल ओंबासे,मल्हारी हांगे,शिवाजी खाडे या पोलीस सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभत आहे.


वडूज नगर पंचायतचे मुख्याधि कारी  मा.अमित पंडीत साहेब,प्रयास सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ.कुंडलिक मांडवे,जागर संस्था यांचेतर्फे पर्यावरणपूरक व सुरक्षित गणेशोत्सवाचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

वडूज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात श्री मारुती मंदिर मधील  सर्वात जुना व सध्या 46 वे वर्ष चालू  असलेला शहराचा पहिला मानाचा गणपती असलेली  व्यापारी गणेशोत्सव मंडळ यांची सुबक प्रसन्न,नवसाला पावणारी देखणी श्रीगणेश मूर्ती, श्री शिवदत्त चौकातील शिवगर्जना मंडळाची  शहरातील सर्वात मोठी  आकर्षक गणेश मूर्ती,शेतकरी चौकातील  शेतकरी गणेश मंडळाची सात्विक गणेश मूर्ती तसेच धान्य बाजारातील रणवीर जय शिवाजी  गणेश उत्सव मंडळाची प्रसन्न गणेश मूर्ती या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.




तसेच श्री गौरी सजावट मध्ये श्री .कांबळे टेलर कुटुंबीय,वेदपाठक ज्वेलर्स कुटुंबीय,लंगडे कुटुंबीय यांचे देखावे आकर्षक ठरले आहेत.

  श्री गौरी - गणपती दर्शनासाठी   भक्त मंडळींची गर्दी होत आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...