Tuesday, September 13, 2022

रुद्राक्षा फौंडेशन संचलित अंश्विक महिला गृहउद्योगाचे उद्घाटन संपन्न,महिलांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील - जोश्विक सरगर

कडेगाव दि :- प्रतिनिधी  दिलीप महाजन 

रुद्राक्षा फौंडेशन संचालित अंश्विक महिला गृहउद्योग याचे उद्घाटन सांगली येथे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक जोश्विक सरगर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी ॲड.अंश खलिपे म्हणाले की, कोरोना महामारीनंतर अनेक्यांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक महिलांना घर चालवणे कठीण जात आहे. महिलांना घरबसल्या काहीतरी काम मिळावे आणि संसाराला हातभार लागावा या विचाराने आणि गृहउद्योगाचे संचालक जोश्विक यांच्या संकल्पनेतून याची सुरुवात करत आहोत. महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे.

यावेळी जोश्विक सरगर म्हणाले की, याच्या माध्यमातून अनेक महिलांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच महिलांनी उद्योजक कसे व्हावे त्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. 

यावेळी आयुषी चव्हाण, प्रज्ञा काळे, माही, ऋतुजा कोळी, विशाल गवळी, जोया सरगर, स्नेहल काळे, विकी जुवेकर, पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...