समाजकार्याचा वारसा जपला पाहिजे : गुरुराज माळगे
कै. डॉ. कमलाकर बबलादी यांच्या स्मृतिदिनी कामगार पाल्यास 10 हजारांची शिष्यवृत्ती
सोलापूर दि 3 :
राजशेखर बुरुकुले लिंगायत TV live प्रतिनिधी
व्यक्तीच्या जीवनात त्यांच्या माता-पित्याला महत्त्वाचे स्थान असते. व्यक्ती आयुष्यभर माता-पित्यांची सेवा करत असते. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या समाजकार्याचा वारसा चालू ठेवणारे काही मोजकेच असतात. कै. डॉ. कमलाकर बबलादी यांचे चिरंजीव राजू बबलादी यांनी त्यांच्या पित्याच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन त्यांच्या स्मृतिदिनी गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांला 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशाच पद्धतीने आपणही समाजकार्याचा वारसा जपला पाहिजे असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे पंच गुरुराज माळगे यांनी केले.
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 66 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
कै. कमलाकर बबलादी यांच्या समाजसेवेचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या पश्चात माझ्याकडूनही सामाजिक कार्य व्हावे या भावनेतून मी हि शिष्यवृत्ती देत आहे. यापुढे प्रतिवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी 10 हजार रुपये एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देणार आहे.
याप्रसंगी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, उद्योजक राजु बबलादी, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे,उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, पत्रकार शिवानंद येरटे उपस्थित होते.
याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या सचिन भतगुणके या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी 10 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचे वडील भीमाशंकर भतगुणके बांधकामावर बिगारी कामगार म्हणून काम करतात. तर आई संपता या बेकरीमध्ये कामगार म्हणून काम करतात. आई-वडिलांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीमुळे सचिनच्या शिक्षणाचा खर्च भागत नव्हता. त्यांची हि अडचण वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना समजली. राजू बबलादी यांनी देखील आपल्या मनातील कल्पना त्यांच्यासमोर व्यक्त केली. अशारीतीने दुतर्फा कार्य सिद्धीस पोहोचले. या दोघींसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 66 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
याप्रसंगी विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.
No comments:
Post a Comment