Thursday, May 19, 2022

म.बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणाला हिंसक वळण


 म.बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणाला हिंसक वळण 
नांदेड, दि.20 - प्रतिनिधी शिवकुमार कल्याणी.
नांदेड जिल्ह्यातील  कंधार तालुक्यामधील उस्मान नगर मध्ये उभारण्यात येणाऱ्या  म.बसवेश्वर पुतळ्याच्या नियोजित जागेतील बॅनर वरील म.बसवेश्वर यांच्या फोटोची चालू पंधरा दिवसात सलग दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली असून त्यामुळे गावात सकाळपासून प्रचंड ताणतणाव निर्माण झाला आहे.यावेळी स्थानिक नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील वाहतूक टायर जाळून अडवून धरली तसेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करून दगडफेक पण करण्यात आली .
तसेच सदर समाज कंटकांचा तात्काळ तपास लावला जावून त्यांना अटक केली जावी व घटना स्थळापासून जवळच असलेल्या पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पोलिसांना निलंबित केले जावे.अशी  जोरदार मागणी बसव ब्रिगेड चे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केली.
यावेळी घटनास्थळी तात्काळ पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
यावेळी आक्रमक आंदोलकांनी पोलीस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व आरोपींचा तात्काळ  तपास केला जाऊन त्यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...