म.बसवेश्वर चौक नामफलक विडंबन बाबत कारवाईची मागणी
सातारा, दि.15 - प्रा.अजय शेटे प्रतिनिधी
संभाजीनगर ( औरंगाबाद) ते जालना मार्गावरील आकाशवाणी भाग येथे औरंगाबाद महापालिकेच्या वतीने येथील चौकाला म.बसवेश्वर चौक असे नाव देवून तेथे अशा नावाचा फलक उभारण्यात आला होता.
परंतु आज सकाळी पाहिले असता ,असे निदर्शनास आले की, सदर नामफलकाची काही समाज द्रोही व्यक्तींकडून तोडफोड झाली आहे.
त्यासाठी लिंगायत संघर्ष समिती ,संभाजीनगरच्या वतीने मा. पोलीस निरीक्षक साहेब,जवाहर कॉलनी व जिन्सी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.ज्ञानेश्र्वर खर्डे,जिल्हाध्यक्ष शिवा खांडखुळे,जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कोठाळे ,जिल्हा सचिव नंदकिशोर गवंडर,जिल्हा कोषाध्यक्ष गणेश सदावर्ते,महिला जिल्हाध्यक्षा सरिता घोडतुरे,शहराध्यक्ष शिवानंद मोधे,जिल्हा सदस्य परशुराम
मोधे,रवींद्र घोडकी इत्यादींची स्वाक्षरी करण्यात आली आहे.
सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी संभाजीनगर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर घटनेचा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज संघटना तसेच लिंगायत संघर्ष समिती यांचे वतीनेही जाहीर निषेध,जाहीर निषेध करण्यात आला आहे
No comments:
Post a Comment