श्री बसव क्रांती ग्रूप,विटा
तर्फे म.बसवेश्वर जयंती चे आयोजन
वडूज , दि.2 - प्रा.अजय शेटे .
विटा , जि.सांगली येथे दि.3 मे 2022 रोजी जगद ज्योती म.बसवेश्वर महाराज यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले आहे.
श्री मन्मथ स्वामी मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून, दु. 12 वा. जन्मकाळ व पुष्पवृष्टी होणार आहे.तसेच सायंकाळी 4 वा. म.बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचा भव्य मिरवणूक सोहळा शहरातून होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास समाजातील स्त्री पुरुष भक्तांनी सर्व कुटुंबासह हजर रहावे.असे आवाहन श्री बसव क्रांती ग्रूप व समस्त लिंगायत समाज,विटा यांचेतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment