Thursday, May 19, 2022

लिंगायतांची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी विशेष लेख - प्रा.अजय शेटे.


 लिंगायतांची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे..
सातारा, दि.19 - गेली कित्येक वर्षे असलेली लिंगायतांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. हि मागणी आता जोर धरू लागली असून लिंगायत हा एक फार पूर्वीपासून स्वतंत्र धर्म आहे.तसेच आपणास अल्पसंख्य दर्जा मिळाला पाहिजे.यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान देणे गरजेचे असून,त्यामुळेच आपल्या असंख्य समस्या सुटून परिस्थिती सुधारणार आहे.
आपल्या भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते.त्यानुसारच संपूर्ण देशाच्या विकासाचे नियोजन होते.इंग्रज पारतंत्र्याच्या काळात सन 1871 ते 1931 अशा 50 वर्षात लिंगायत हा एक वेगळा समूह असल्यामुळे ब्रिटिशांनी अनेक प्रांतात लिंगायतांची स्वतंत्र जनगणना केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
मात्र स्वातंत्र्यानंतर लिंगायत,जैन,शीख अशा कोणत्याच समुदायाची जनगणना करण्यात आली नाही.त्यामुळे या सर्वांचा अल्पसंख्य हा दर्जा धोक्यात आला.तेव्हा जैन व शीख यांनी लढून,झगडून तो हक्क प्राप्त केला.जाऊन धर्माला तर अगदी अलीकडेच हा हक्क मिळाला आहे.याच कालखंडात लिंगायत धर्म मान्यतेचा लढा पण कमीजास्त प्रमाणात चालू होता.परंतु त्यावेळच्या आपल्या राजकीय नेत्यांची उदासीनता व धार्मिक क्षेत्रातील छुपे गुरुवर्य यांनी कधी ' वीरशैव ' तर कधी 
' वीरशैव लिंगायत ' अशा संभ्रमित नावाने भेसळ धर्मतत्वे सांगून प्रचलित मागणीत अवरोध निर्माण केला.
वास्तविक 'लिंगायत'हा एक फार पूर्वीपासून एक वेगळा धर्म असून ,त्यांचे जन्म ते मृत्यू असे सर्व संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत.आपली धर्म भाषा वेगळी असून धर्मसंस्थापक म.बसवेश्वर आहेत.आपले पवित्र धर्म श्रीक्षेत्र बसवकल्याण, कुडलसंगम ,
उळवी, गुड्डापूर , संगय्या,मंगळवेढा ही आहेत.पवित्र धर्मग्रंथ ' वचन साहित्य ' आहे.लिंगायत कोणतेही सुतक पाळत नाहीत. वर्गभेद,वर्णभेद करत नाहीत.स्त्रीपुरूष समानता मानतात.' ईष्टलिंग ' हि एकदेव उपासना तो करतो.धर्मप्रसारक जंगम आहे.धार्मिक विधी चर जंगम यांचे कडून करून घेतो.तरीही लिंगायतांना सनातन,वैदिक ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय.यात नक्कीच इतर धर्म व समाजाचा विशेष स्वार्थ असून हे एक मोठे षडयंत्र आहे.अशी शंका येतीय.
आज मात्र '' वीरशैव ' व '' लिंगायत ' या दोन नावांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातोय.कदाचित ते एकत्र असतीलही मात्र एकाच धर्माला दोन नावे देण्याचा आग्रह हा काही प्रामाणिक वाटत नाही.तसे जगाच्या इतिहासात कोठेही नाही .तरीही काही गुरु,जाणकार अशी मागणी करतात तेव्हा शंका येते.वीरशैव नावाने धर्म मागणी केली तेव्हा लिंगायतांनी विरोध केला नाही.परंतु लिंगायत धर्म म्हटल्यावर या विरोधात कथित गुरु, पंचाचार्य,शिवाचार्य यांनी बेंगलोर मध्ये बैठक घेवून शासनाला निवेदन दिले.
असे का होत आहे ? वैदिक व्यवस्थेशी यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का ? असे असेल तर त्यांनी लिंगायतांचा संबंध सोडून द्यावा.पण ते असे करणार नाहीत.इतके दिवस ते फक्त वीरशैव म्हणत होते.आणि आता वीरशैव लिंगायत म्हणत आहेत.म्हणजे लिंगायतांशिवाय त्यांना गत्यंतर नाही.किंबहुना लिंगायतांना हक्क,अधिकार या पासून वंचित करून त्यांच्याच दान दक्षिणा,देणग्या आणि राजकीय लाभावर मजा करायची एवढाच उद्देश त्यातून दिसून येतो.
म.बसवेश्वर यांचा इतिहास इतका आहेकी,समता,ममता,आचार,विचार यांचे हृदयस्पर्शी तत्वज्ञान त्यांनी दिले.केवळ भारतातच नव्हे तर लोकशाहीची जननी असले ल्या लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठावर या विचार पुरुषाचा पुतळा उभा करून त्याला पुष्पहार अर्पण केला जातोय.आणि सर्वत्र बसवादी शरणाचा गौरव केला जातोय.आणि त्यांनाच हे डावपेच करणारे लोक अनुल्लेखित करतात.खाजगीत नाकारतात,विचार विरोधी होमहवन करतात.जिवंत मानवांच्या खांद्यावर पालखीत बसतात.श्री बसवण्णा म्हणवतात आणि त्यांच्या फोटो खालून ही जात नाहीत .
अशा या धर्म गुरुं मुळेच लिंगायत संविधानिक धर्म मान्यता हा विषय रेंगाळतो आहे.परिणामी लाखो करोडो सामान्य लिंगायत धर्म बांधव प्रगती पासून वंचित राहतात.
या नंतर विषय येतो तो आपल्या नेते मंडळींचा लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता मिळू नये म्हणून काही सनातनी व्यक्तींकडून ,संघटनांकडून जाणीव पूर्वक प्रयत्न केले जातात.कारण या लिंगायत लोकसंख्येवरचा आर्थिक निधी लिंगायतांना द्यावा लागेल. हे ते सहन करू शकत नाहीत.त्यासाठी ते लिंगाय तांमधीलच काही स्वार्थी दलाल,अज्ञानी,आपमतलबी बुजगावणी नेत्यांचा वापर करतात.त्यांच्या अमिषाला हे नेते बळी पडतात व लिंगायत विरोधी भूमिका घेतात.संभ्रम निर्माण करतात.त्यासाठी प्रतिगाम्यां कडून आर्थिक रसद पुरवली जाते. व हक्काच्या विषयावर लिंगायतांना एकत्र येवू दिले जात नाही.दोन गट पाडले जातात.
अशा प्रकारची सनातनी व्यवस्था गुरु,दलाल,नेते यांना हाताशी धरून जनआंदोलन व प्रामाणिक धर्म जागृती कार्य बंद पाडतात.लिंगायत विरोधी लिंगायत कसा उभा राहील हे पाहतात.अशा सनातन्यांच्या डोक्याने चालणाऱ्या अज्ञानी व अर्ध ज्ञानी, महत्त्वाकांक्षी गुरु व नेते ,कार्यकर्ते यांना जाणीवपूर्वक नेतृत्व देवून प्रतिगामी मोठे बनवतात. भोळा भाबडा समाज त्यांनाच आपला नेता मानतात.अशा वेळी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गुरु,नेते,विचारवंत कार्यकर्ते यांची आपल्याच समाजाकडून हेटाळणी होते व परिणामी त्याचे चांगले कार्य बंद पडते.
लिंगायत समाजातील अनेक असे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या जातींच्या,संघटनेच्या,पक्षांच्या दावणीला बांधले जातात.त्यांना एखादे इलेक्शन चे तिकीट,गाडी,पैसा दिला जातोआणि काम संपल्यावर त्याला पण अडगळीत फेकले जाते. अशा प्रकारे हुशार व्यक्तीकडे समाजाचे नेतृत्व जावू दिले जा त नाही.तेव्हा अशा कार्यकर्त्यांनी सदर बिनकामाची पदे सोडून फक्त  समाज हित कामाच्या गोष्टी कराव्यात. व अशी सद्बुद्धी सर्वांना लवकर येवो .एवढीच  कळकळीची माफक अपेक्षा.जय श्री बसवेश्वर,ओम नमः शिवाय !.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...