Thursday, April 14, 2022

श्री रेवण सिध्देश्वर महास्वामी, नागण सूर - जीवन आणि कार्य


श्री रेवण सिध्देश्वर महास्वामी, नागण सूर  - जीवन आणि कार्य 
सातारा दि.15 - विशेष लेख, प्रा.अजय शेटे. 
भरपूर तुपाचे होमहवन केल्याने तृप्ती मिळत नाही तर तेच तूप गरजू भुकेल्याना खावू घातले तर निश्चितच देवी अन्नपूर्णे ची सेवा घडून येवून दाता व याचक या दोघांनाही तृप्ती चे पुण्य मिळते.या भावनेतून होमहवन करताना अना वश्यक तूपाची आहुती न देता तेच तूप अन्नदानात दान करून,खावू घालावे.हाच मानव विज्ञान वादी विचार व दृष्टिकोन पेरण्यासाठी रेवण सिद्धेश्वर महास्वामी यांनी आयुष्यभर एक मोठी चळवळ आपल्या कृतीतून उभी केली.
    श्री ब स व लिंगेश्वर महास्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त पाच हजार जंगम व पाच हजार सुवासिनी यांची ओटी भरून त्यांना पौष्टिक पुरणपोळी व तुपाचे पंच पक्वान्न असा महाप्रसाद ते खावू घालत . अन्नदानातील तूप ते केवळ चमच्यानेच नव्हे तर मोठा तांब्या अथवा कवळ्याने वाढले जात असे.या महाप्रसादाचा लाखो भक्त एकाच दिवशी आस्वाद घेत असतं.
केवळ 10 x 12 एवढ्या जागेत एक खोली असलेल्या मठाचे एका महाकाय विशाल वटवृक्षा त रूपांतर करणारे ते एक महान धर्म प्रसारक,समाज प्रबोधनकार,युगप्रवर्तक महास्वामी ठरले.मानवीय ता, दया भाव,प्रबोधन हे त्यांचे कार्य ठरले.
   सामाजिक ,सांस्कृतिक चळवळीला ते नेहमी प्रोत्साहन देत.त्यामुळे मठ संस्थांना मध्ये नेहमी दरवर्षी  भजन,भारुड,नाटक असे विविध सांस्कृतिक लोककला प्रकार कार्यक्रम व्हायचे.आपल्या मठ संस्थांना तर्फे सामुदायिक विवाह सोहळे पार पाडून त्यांनी सर्वधर्म सम भाव ही जपला होता.
  दरवर्षी होणाऱ्या मठाच्या उत्सवात स्वखुशीने मोफत वाहतूक सेवा बजावली जायची.या यात्रेत महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असत.त्यांच्या या महान कार्यामुळे नागण सूर ब स व लिंगेश्वर मठ संस्थानाला तूप पोळीचे मठ संस्थान व रेवण सिद्धेश्वर महास्वामी यांना तुपाचे तीर्थ देणारे महास्वामी अशा नावाने ओळखले जायचे.
नुकतेच दि.14 एप्रिल 2022 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नागण सूर येथील ब स व लिंगेश्वर विरक्त मठाचे मठा धि पती श्री म नि प्र रेवण सिद्धेश्वर महास्वामी हे लिंगैक्य झाले आहेत.पुरणपोळी आणि तुपाचा दासोह चालवणारे एक युगपुरुष काळाच्या पडद्या आड गेल्यामुळे सर्व भाविक भक्तांवर शोककळा पसरली आहे.
अशा या पुण्यवान महास्वामी महाराजांना वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही  च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन. 

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...