Tuesday, February 1, 2022

गोदाकाठचं धाडसी नेतृत्‍वःजनसामान्‍यांचा बहुजन नेता – प्रा. मनोहर धोंडे

 

गोदाकाठचं धाडसी नेतृत्‍वःजनसामान्‍यांचा बहुजन नेता – प्रा. मनोहर धोंडे






गोदाकाठचं धाडसी नेतृत्‍वःजनसामान्‍यांचा बहुजन नेता – प्रा. मनोहर धोंडे




देगलूर दि २ :- शिवकुमार कल्याणी लिंगायत टिव्ही देगलूर

       शिवा संघटनेचे संस्थापक तथा  रा‍ष्ट्रीय अध्‍यक्ष, बहुजनांचे नेते, स्‍पष्‍ट वक्‍ता, रुबाबदार व्‍यक्‍तीमत्‍व, प्रशासनात वेगळा दबदबा असलेले जनसामान्‍याचे बहुजनांचे नेते प्रा. मनोहर बाबाराव धोंडे सर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कार्य करत दिन दलित, कष्‍टकरी, वीरशैव, अल्‍पसंख्‍याक, शेतकरी, कष्‍टकरी, तरुण बेरोजगार, महिला यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी अहोरात्र   परिश्रम करणारे प्रा. मनोहर धोंडे सराचे २ फेब्रुवारी २०१९ रोजी ५२ वा वाढदिवस आहे. सरांचा आतापर्यंत च्‍या कार्याचा थोडक्यात आढावा प्रसिद्ध करीत आहोत.

      नांदेड – लातुर राष्‍ट्रीय महामार्गावर सोनखेड पासून अवघ्‍या 7 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सानीध्यात  गोदावरी नदीकाठावर असलेल्‍या शेवडी (बा)ता. लोहा जि.नांदेड या छोट्याश्या गावी  २ फेब्रुवारी १९६७ रोजी मनोहर बाबाराव धोंडे सरांचा शेतकरी कुटुबात  जन्‍म झाला गावातील जिल्‍हा परिषद केंद्रीय शाळेत १ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतल्‍यानंतर पुढील शिक्षण नांदेड येथे ८ वी ते १० वी पिपल्‍स हायस्‍कूल नांदेड येथे तर ११ वी व १२ वी यशवंत कॉलेज नांदेड येथे शिक्षण घेतले. आभ्‍यासात हुशार असल्‍यामुळे १२ वी नंतर प्रा. धोंडे सरांनी बी.एस्‍सी ( भूर्गभशास्‍त्र ) हा विषय घेवून सायन्‍स काॅलेज नांदेड येथे  पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. तेव्हाचे मराठवाडा विद्यापीठातुन  बी.एस्‍सी. मिरिट मध्‍ये आले .त्यानंतर उच्‍च शिक्षण एम. एस्‍सी  भूगर्भशास्त्र

शासकीय विज्ञान संस्‍था औरंगाबाद  येथे पूर्ण केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्‍हापूर च्‍या सोलापूर येथील उपकेद्रातून भूभूगर्भशास्त्र  सरांनी एम.फील चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यानी सायन्‍स कॉलेज नांदेड येथे जुन १९८९ रोजी वरीष्ठ  प्राध्‍यापक म्‍हणून ते रुजू झाले. नौकरी करतानाच शासकीय बि.एड. काॅलेज नांदेड येथे बि.एड.पदवी पुर्ण केली.परंतु  तेथे मन रमत नसल्‍याने त्‍यांनी नांदेड  येथील नौकरी सोडून 18 जुलै १९९१ रोजी औरंगाबाद येथील नावाजलेल्‍या देवगिरी महाविद्यालयात ते पून्‍हा प्राध्‍यापक म्‍हणून रुजू झाले. औरंगाबाद येथील मौलाना आझाद अध्यापक महाविद्यालयात येथे एम.एड. पदवी पुर्ण केली. देवगीरी काॅलेज येथे  आध्‍यापनाचे कार्य करत असतानाच महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परिक्षेत उज्‍जवल यश संपादन करुन जालना येथे राजपत्रित अधिकारी म्‍हणून निवड झाली परंतु  सरांनी ती शासकीय नौकरी केली नाही.

 राजकीय जीवनास प्रारंभ

      प्रा. मनोहर धोंडे सर यांनी विद्यार्थी दशे पासूनच विविध आंदोलनात  सक्रीय सहभाग घेतला होता. स्‍पष्‍ट वक्‍ता, धाडसीपणा, अंगी असल्‍यामुळे काही तरी नविन करण्‍याचा गुण त्‍यांच्‍यात असल्‍याने त्‍यांनी एम.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच १२ ऑगस्‍ट १९८८ रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली तेव्हा  शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर मोठा विश्‍वास ठेवून प्रा. धोंडे सर यांच्‍यावर भारतीय विद्यार्थी सेना मराठवाडा प्रमुख म्‍हणून जबाबदारी टाकली. सरांनी अत्‍यंत मेहनत घेवून भारतीय विद्यार्थी सेना मराठवाड्याच्‍या कानाकोप-यात पोहचविली. सराकडे आजही हे पद कायम आहे. या माध्‍यमातून प्रा. धोंडे सरांनी विद्यार्थ्‍यांच्‍या शिष्‍यवृत्‍ती , फीस संदर्भात तसेच विद्यार्थ्‍यांच्‍या वस्‍तीगृहाचा प्रश्‍न, अडी अडचणी, फी वाढ, या संदर्भात आंदोलने करुन विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न वेळोवेळी मार्गी लावले. १९८८ ला मराठवाड्यात भारतीय विद्यार्थी सेनेचा शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद येथे पहीला पॅनल विजयी करून विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होऊन झेंडा फडकविला.त्याचवेळी  शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. धोंडे सर यांची पक्ष निरिक्षक म्‍हणून नांदेड जिल्‍हयासाठी नियुक्‍ती केली होती. १९८९ साली जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे शिक्षण घेणारे श्री. अर्जून खोतकर ( सध्‍याचे मंत्री ) यांची भारतीय विद्यार्थी सेना जालना जिल्‍हा प्रमुख म्‍हणून सरांनी निवड केली. यानंतर1990 च्या विधानसभा निवडणूकीत सरांच्या शिफारशी वरून भा.वि. सेनेचे श्री. अर्जून खोतकर यांना जालना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली त्यात ते विजयी झाले  प्रा.धोंडे सर यांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार  १६ जून १९९५ रोजी शिवसेनेच्‍या वतीने मराठवाडा पदविधर मतदार संघातून निवडणूक लढविली. त्यानंतर १९९९ च्या पोटनिवडणुकीत  दुस-यांदा मराठवाडा पदविधर मतदार संघातून शिवसेने कडून  निवडणूक लढविली. त्यानंतर लोहा – कंधार मतदार संघातून शिवसेनेकडून २००९ साली विधानसभेची निवडणूक लढविली.आजही ते गोरगरीब, बहुजनांच्या सेवेसाठी सदैव तत्पर  आहेत

शिवा संघटनेची भरारी...!

       वीरशैव समाजाच्‍या विविध प्रश्‍नांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी म्‍हणावे तसे नेतृत्‍व दिसेना गेल्‍याने समाजाच्‍या न्‍याय, हक्‍कासाठी स्‍वतः प्रा. मनोहर धोंडे सरांनी २८ जानेवारी १९९६ ला रणशिंग फुकून शिवा या राष्‍ट्रीय सामाजिक संघटनेची मुर्हतमेढ रोवली, सिडको, नांदेड येथील शिवलिंगेश्‍वर मंदिरात शिवा संघटना स्‍थापना केली. प्रा. मनोहर धोंडे सर यांनी गाव तेथे शिवा संघटनेची स्‍थापना करुन विरशैव समाजाच्या  प्रश्‍नाना न्‍याय देण्‍यासाठी ते प्रयत्‍नाशील राहून गेली 22 वर्षापासून हे कार्य सुरु आहे. शिवा संघटनेचे राज्‍यात ३८०० शाखा आहेत. त्याशिवाय तेलंगणा, कर्नाटक, अंध्राप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश व गोवा या राज्‍यातही शिवा संघटनेच्‍या 1800 शाखा कार्यरत  आहेत. शिवा संघटनेचा वर्धापन दिन दि. २८ जानेवारी २०१३ रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील पंचतारांकित हॉटेल ग्‍लोबल टॉवर येथे साजरा करण्‍यात आला. तसेच २८ जानेवारी २००६ रोजी नवी दिल्‍ली येथे राष्‍ट्रपती भवनाजवळील मालवणकर हॉल नवी दिल्‍ली येथे  शिवा संघनेचा दहावा वर्धापन दिन साजरा केला.त्यासाठी शिवा  एक्‍सप्रेस नावाने दहा डब्याची विशेष रेल्वे १० दिवस भाडयाने घेऊन नांदेड-दिल्ली-वाराणसी- नांदेड अशी नेली होती.  त्यानंतर २८ जानेवारी २०१७ रोजी इंग्‍लंडची राजधानी लंडन येथील पंचतारांकित हाॅटेल डबल ट्री बॉय हिल्‍टन मध्‍ये शिवा संघटनेचा 21 वा वर्धापन दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. तर नुकतेच २८ जानेवारी २०१८ रोजी तेलंगना राज्‍यातील हैद्राबाद येथे 22 वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. शिवा संघनेच्यामाध्यमातून भारताच्या संसद भवनात महात्मा बसवेशवरांचा पुतळा बसविणे, विरशैव समाजातील एकेेविस जातींना ओबीसीचे आरक्षण मिळवून देेणे, महात्मा बसवेेेेशवर यांची महाराष्ट्रासह देशात शासकीय जयंती साजरी करून शालेय अभ्यासक्रमात धडे समाविष्ट करणे व मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक मंजुर करणे या सारखे अनेक प्रश्न निकाली काढले आहेत

अन् सर्वोच्‍च न्‍यायालयातून लढा जिकंला...!

       अन्‍यायाबदल सरांच्‍या मनात चीड आहे. प्रशासनान चुकले तर ते तात्‍काळ त्‍यावर अंदोलनाचा  निर्णय घेतात हे ही तितकेच खरे आहे. अन्‍याया विरूध्द ची मशाल धरुन प्रशासनाकडून न्‍याय न मिळाल्‍याने औरंगाबाद येथील एका शिक्षेकेच्‍या प्रकरणात सरांनी सर्वोच्‍या न्‍यायालयात लढा जिकला. या बाबत थोडक्‍यात माहिती अशी की जय भवानी हायस्‍कूल औरंगाबाद येथील महिला शिक्षकेवर संस्‍थाचालकाने केलेल्‍या अत्‍याचार प्रकरणी प्रा. धोंडे सर यांनी आंदोलन करुन संस्‍थेवर प्रशासक नियुक्‍त केला. आणि याविरुद्ध  उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली.उच्च  न्‍यायालयाने जनहित याचिका दाखल केली परंतु ती उच्च  फेटाळली.  म्हणून  प्रा. धोंडे सर यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात जनयाचिकेचे अपील दाखल केले.या याचीकेचा निकाल प्रा.धोंडे सर यांच्या बाजुने लागला तो असा की केंद्र व राज्य सरकार मधील शासकीय व निमशासकीय महीला नौकरदार यांच्या सुरक्षेसाठी

  व त्‍यांचा  छळ होवू नये यासाठी महाराष्ट्रासह देशभर या याचिकेद्वारे महीला सुरक्षेचा कायदा लागू झाला.आणि प्रा.धोंडे सर यांच्‍या या धाडसामुळे देशभरातील महिलांना न्‍याय मिळाला.

नांदेड –लोहा- अहमदपूर – लातुर रोड रेल्‍वे मार्गास मंजुरी

प्रा. मनोहर धोंडे सरांनी नांदेड – लोहा – अहमदपूर – लातूर रोड रेल्‍वे मार्गास  मंजूरी द्यावी अशी करून प्रचंड धडक मोर्चा काढला परंतु  परंतु  रेल्‍वे मंत्रालयाने मागणी मंजूर न केल्‍याने स्‍वतः प्रा. धोंडे सरांनी औरंगाबाद उच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानुसार  नांदेड – लोहा – अहमपुर – लातूर रोड, रेल्‍वे मार्गास मंजूरी मिळाली. यानंतर हे श्रेय घेण्‍यासाठी इतर नेत्यात चढाओढ लागली. सरामुळे रेल्‍वेचा प्रश्‍न मार्गी लागला.

किल्लारी भूकंपात कामगिरी

       १९९३ ला लातूर जिल्‍ह्यातील किल्‍लारी येथे भूंकप झाला. त्या भुकंपा  संदर्भात प्रा. धोंडे यांनी वैज्ञानिक अहवाल देऊन लातुर येथे युरेनियम व थोरीयम सारखी हायड्रोजन बाॅम्ब साठी लागणारे साठे लातुर परीसरात असल्याची  शक्यता असल्या बाबतचा  तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शरद पवार यांना दिला. त्यावरू. तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शरद पवार यांनी प्रा. मनोहर धोंडे  यांच्‍या अहवाला वरून या भुकंपा संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारला माहीती देऊन  अमेरिकन एजंसीला बोलावून किल्‍लारी भूकंपाची पाहणी केली होती.

 बहुजन विस्‍थापितांना न्‍याय

     मोर्चे, आंदोलने, न्‍यायालयीन लढा, देवून प्रा. धोंडे सरांनी बहुजन विस्‍थापितांना तसेच सर्व स्‍तरातील जनतेला न्‍याय दिला आहे.

      सरांचा आज ५२ वा वाढदिवस... त्‍यांना कोटी कोटी शुभेच्‍छा....


No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...