Thursday, March 9, 2023

लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस .




लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.




लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
सातारा दि 9 :- रविंद्र वाकडे 
Maharashtra Budget 2023 |  शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पामध्ये नवीन महामंडळांची स्थापना करण्याची आणि भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे.
 
 
 देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा (Maharashtra Budget 2023)

- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (Jagatjyoti Mahatma Basaveshwar Economic Development Corporation)
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (Sant Kashiba Gurav Youth Economic Development Corporation)
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (Raje Umaji Naik Economic Development Corporation)
- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ (Pailwan  Maruti Chavan-Vadar Economic Development Corporation)- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...