गुणवंत भाऊ - बहिणीची उच्च शिक्षणासाठीची निवड हि गुणवंत भाऊ - बहिणीची उच्च शिक्षणासाठीची निवड हि प्रेरणादायी गुणवंत भाऊ - बहिणीची उच्च शिक्षणासाठीची निवड हि प्रेरणादायी ठरेल .
गुणवंत भाऊ - बहिणीची उच्च शिक्षणासाठीची निवड हि गुणवंत भाऊ - बहिणीची उच्च शिक्षणासाठीची निवड हि प्रेरणादायी ठरेल .
सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे .प्रतिनिधी
शाळगाव येथील लिंगायत समाजातील प्रतिथयश डॉ.ज्ञानेश्वर व डॉ. मीना सुपनेकर यांचे चिरंजीव श्रेयस याची जेईई अडव्हांस 2022 या स्पर्धा प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवून आय आय टी मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश निवड झाली आहे.
तसेच त्यांचीच कन्या असलेल्या कु. श्रेया हिची व्ही आय टी परीक्षा वेल्लुर येथे 'बायो टेक ' या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे,
'शुद्ध बीजा पोटी - फळे रसाळ गोमटी ' या उक्तीप्रमाणे या डॉक्टर दाम्पत्याची ही गुणी मुले आहेत. या डॉक्टर दांपत्याने कराड तालुक्यासह,उंब्रज पंचक्रोशी व शाळगाव परिसर येथे गेली अनेक वर्षे अतिशय प्रामाणिक पणाने गरजू रुग्णांची रुग्णसेवा करीत आपल्या दोन्ही अपत्यांच्यावरही तितकेच गुणी सुसंस्कार केले आहेत आणि त्याचेच फळ आत्ता त्यांना प्राप्त झाले आहे.
त्यामुळे संपूर्ण भागातून त्यांचे अभिनंदन होत असून,त्यामुळे अनेक भावी मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे.असे मत येथील श्री.उमेश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी शाळगाव ग्रामस्थांनी श्रेयस आणि श्रेया यांचा सत्कार केला . विजय मोहिते,प्रल्हाद कारंडे, भगवान पाटील , मोहन पाटील,सुभाष कारंडे,दादा मुळीक , अजय सावंत, डॉ.संजय पवार, डॉ.सागर पवार, डॉ. कांबळे, तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
चि.श्रेयस व कु. श्रेया यांचे लिंगायत टिव्ही लाईव्ह,वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव लिंगायत समाज संघटना यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.







No comments:
Post a Comment