म.बसवेश्वर यांनी स्थापन केलेली अनुभव मंटप हि जगातील पहिली संसद - शरणी शितल महाजन.
सातारा, दि.12 - प्रसाद वाकडे प्रतिनिधी म.बसवेश्वर यांच्या विश्वबंधुत्ववादी वचनाने 12 व्या शतकात मोठी समतावादी क्रांती झाली व त्यातून अठरा पगड जाती एकत्र येवून ' अनुभव मंटप ' च्या रूपाने एक नवीन लोकसंसद निर्माण झाली. व तीच आधुनिक लोकशाहीची खरी जननी ठरली.असे मत शितल महाजन यांनी बसव व्याख्यान मालेत बोलताना व्यक्त केले.
म.बसवेश्वर जयंती निमित्त अखिल वीरशैव महिला मंडळ,कर्नाटक संघ ,अक्कमहादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ' विश्र्वरुप हॉल ' ज्योती नगर , औरंगाबाद येथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
रुद्राणी कोठाळे व श्रेयश कोठाळे यांनी गायिलेल्या ' शिवतांडव स्तोत्राने' व्याख्यान मालेची सुरुवात करण्यात आली.अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ. मीना पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून वैजयंती खरे, डॉ.आशा सकोळकर यांची उपस्थिती होती.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ' म.बसवेश्वर यांचे जीवन कार्य '
या विषयावर शितल महाजन यांनी गुंफले.दुसरे पुष्प म बसवेश्र्वर यांचे' वचन संदेश ,'या विषयावर शरण गणेश वैद्य यांनी गुंफले.
या वेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक तसेच पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेतील विजेत्यांना शिल्पा राणी वाडकर,विमला हबू तसेच ज्ञानेश्र्वर आप्पा खर्डे यांच्या तर्फे बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
संचालन स्मिता ममदापुरे,प्रास्ताविक शिल्पा राणी वाडकर तसेच आभार प्रदर्शन स्मिता कोठाळे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका शोभा बुरांडे, विरेंद्र मंगलगे ,सचिन संगशेट्टी , अमन दामा, हुरणे आप्पा यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment