00म. बसवेश्वर हे एक दिव्य व्यक्तिमत्त्व - सुनिता नगरकर.
सातारा, दि.12 - प्रा.अजय शेटे.प्रतिनिधील9कोO
" मी लिंगायत आहे म्हणून मला म.9 यांचे बद्दल विशेष प्रेम अथवा आदर आहे असे नाही तर म.बसवेश्वर हे दिव्य व्यक्तिमत्त्व आहे हे त्यांच्या जीवन कार्यातूनच आपल्याला समजून येते." असे उद्गार सुनिता नगरकर यांनी निगडी येथे बोलताना व्यक्त केले .
म.बसवेश्वर जयंती निमित्त , 'मला भावलेले बसवण्णा ' या विषयावर त्या बोलत होत्या.
नगरकर पुढे म्हणाल्या की, "म.बसवेश्वर यांचा जन्म सुखवस्तू कुळात झाला होता तरीही त्यांनी समाजातील अंधकार,दांभिकता यांचेसाठी क्रांती केली. म.बसवेश्वर यांच्या वचनामध्ये कल्पना विलास नसून ,जीवन अनुभव कथन आहे."
लिंगायत माळी समाज संघ पुणे व जागतिक लिंगायत महासंघ यांच्या वतीने म.बसवेश्वर जयंती उत्सव निगडी येथील सेक्टर 26 मधील म.बसवेश्वर भवन मध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी नगरकर बोलत होत्या.कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून समस्त लिंगायत समाजाचे आयोजक आप्पासाहेब वाले,अशोक नगरकर,बाळकृष्ण विसापूरे,चंद्रशेखर हुशनाळ, चंद्रकांत खोचरे,संगमेश्वर शिवपूजे,सिद्धरामेश नावदगिरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment